
आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
श्री कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जळकोट ता.तुळजापूर येथे विविध उपक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथमत: गावातून प्रभात फेरी काढण्याणत आली ,कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष चव्हाण साहेब प्रमुख पाहुणे म्हणून श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पवार मॅडम माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गुरव सर श्री कारले सर, व राठोड मॅडम यांची उपस्थिती लाभली.
नंतर शाळेच्या प्रांगणात प्राचार्य श्री संतोष चव्हाण साहेब व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली.
महावाचन उत्सव उपक्रम 2024 मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आदरणीय प्राचार्य संतोष साहेबांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले .
स्वच्छता ही सेवा 2024 बाबतीत सामुहिक स्वच्छता शपथ घेण्यात आली व स्वच्छता अभियान आणि स्वच्छतेचे महत्त्व बाबत प्रबोधन करण्यात आले.आजचा विशेष कार्यक्रम म्हणून एक पेड माॅ के नाम या अभियान उपक्रमामध्ये प्राचार्य, शिक्षक, व विद्यार्थी समवेत वृक्षरोपण केले.
याप्रसंगी गावातील सन्माननीय मान्यवर सरपंच, उपसरपंच , पोलिस पाटील,आजी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष व पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी, चेअरमन व पदाधिकारी,प्रशाला मुख्याध्यापक,प्रतिष्ठित नागरीक,पालक वर्ग,
पालक माता भगिनी आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पवार मॅडम माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गुरव सर श्री कारले सर, व राठोड मॅडम यांची उपस्थिती लाभली.
शेवटी मान्यवरांचे मार्गदर्शनपर मनोगतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हक्के सर, कांबळे सर व साबळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन कांबळे सर तर आभार साबळे सर यांनी मानले.अशा प्रकारे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध उपक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.🙏
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे विशेष आभार…..
श्री कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जळकोट..
Discussion about this post