⛔ जि प शाळा लाटे वस्ती,महाळुंग येथील विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब अकलूजचे विविध सामाजिक उपक्रम…
अकलूज :- रोटरी क्लब अकलूज आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज यांच्या संयुक्त विद्यमानातून माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लाटे वस्ती, महाळुंग या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी पाण्याची टाकी तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले…
याप्रसंगी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना रोटरी क्लब अकलूजचे सचिव मनीष गायकवाड सर यांनी “गुड टच आणि बॅड टच” याविषयी बहुमोल मार्गदर्शन करताना त्यांना ओळखीच्या तसेच परक्या माणसांकडून होत असलेला स्पर्श व त्या स्पर्श मधील चांगला स्पर्श कसा ओळखावा व वाईट स्पर्श कसा ओळखावा हे सांगताना वाईट स्पर्श कशा पद्धतीने असू शकतो याबाबत विविध उदाहरणे देत,जर असा स्पर्श जाणवला तर त्याबाबत आई,वडील व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी त्वरित माहिती दिली पाहिजे हे अतिशय सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितले…
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा यासाठी सुंदर असा इलेक्ट्रो गेम सेट रोटरी क्लब अकलूज च्या वतीने शाळेसाठी भेट देण्यात येऊन जमलेल्या मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले…रोटरी क्लब अकलूजचे उपाध्यक्ष रो.नवनाथ नागणे यांनी सदर शाळा ही वाडी वस्तीत व दुर्गम भागात असताना देखील शाळेचे मुख्याध्यापक दिलीप उकिरडे सर आणि श्रीमती रेहाना तांबोळी मॅडम यांनी शाळेचा पट वाढविण्याबरोबरच गुणवत्तेस प्राधान्य दिले आहे. व गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मन,मेंदू आणि मनगट यांच्या विकासाला वाव मिळाला पाहिजे या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण उच्च रितीने देण्याचा त्यांचा प्रयत्न अभिमानास्पद आहे व खेळ,मनोरंजन याबरोबरच चांगल्या सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत हे देखील कौतुकास्पद आहे असे सांगितले…
प्रारंभी प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक दिलीप उकिरडे सर यांनी उपस्थितींचे स्वागत करत रोटरी क्लबचे शाळेसाठी सातत्याने सहकार्य लाभत असल्याचे त्याचा विद्यार्थी व शाळेस खूप मोठा फायदा होत असल्याचे सांगत माळशिरस तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे केंद्रप्रमुख सौ.भक्ति नाचणे मॅडम,माजी शिक्षण विस्ताराधिकारी हर्षवर्धन नाचणे यांचे गुणवत्ता विकासासाठी सतत मार्गदर्शन लाभत असून विद्यार्थ्यांना अजून चांगल्या सोयी कशा मिळू शकतील यासाठी नेहमीच प्रयत्न असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती रेहाना तांबोळी मॅडम यांनी आभार व्यक्त केले…
याप्रसंगी माजी शिक्षण विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे,केंद्रप्रमुख सौ.भक्ती नाचणे मॅडम,रोटरी क्लबचे संचालक केतन बोरावके,अजित वीर,वीरेन गांधी,भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट चे प्राचार्य व रोटरीचे सदस्य गजानन जवंजाळ,भक्ती संस्थेतील विद्यार्थी प्रतिनिधी प्रदीप माने,आर्यन नागरगोजे,किरण ओवाळ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा,उपाध्यक्षा तसेच सर्व महिला सदस्य उपस्थित होते…

Discussion about this post