टाळ, मृदंगाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप..
गिरोली: येथे लाडक्या बाप्पाला बुधवारी मोठ्या हर्ष उल्हासात निरोप देण्यात आला.
या वेळी टाळ मृदंगाच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली.
चिंतामणी बाल गणेश उत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक पोलिस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या निगराणीत पार पडली.
या मध्ये मंडळ उत्सवाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून नियोजनबध्द विसर्जन आकर्षणाचे केंद्र ठरले.
डीजे एवजी टाळ, मृदंगाच्या गजरात अभंग गायन, गवळणीच्या सुमधुर आवाजात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणूक संपन्न झाली.
या विसर्जन मिरवणूकित गावातील नागरिकांचा उस्फुर्त सहभाग होता. या वेळी युवती, महिलांनी फुगड्या खेळत लाडक्या गणरायाला निरोप दिला.
Discussion about this post