
जळीत दुकान प्रकरणी न्याय देऊन आरोपीस तत्काळ अटक करावी – व्यापारी महासंघ उमरखेड मागणी..
(उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना काही निवेदन)
उमरखेड (दिनांक २० सप्टेंबर) मागील दोन दिवसापूर्वी काही समाजकंटकांनी आमच्या संघटनेतील किराणा व्यापारी मे. बाबु नारायण पेन्शनवार लफे प्रो.प्रा. सतीष बाबुराव पेन्शनवार यांचे दुकान दि. १८/०९/२०२४ रोजी मध्यरात्री जाळले. त्यामुळे या व्यापारी बांधवाचे अतोनात नुकसान झालेले आहे. जे नुकसान झालेले आहे ते त्यांची उभी आयुष्याची कमाई आहे.
जिकी एका दिवसात भरुन निधनार नाही.
या झालेल्या नुकसानाचे आपण शासन स्तरावर अथवा ज्या समाज कठकाने केले आहे. त्यांच्याकडून नुकसान भरपाई भरुन देण्यात यावी.
व आत्तापर्यंत या घटनेस घडून ७२ तास झाले आहे. तरी पण त्या समाज कंठकास अटक करण्यात प्रशासनाला यश आले नाही. तरी त्वरीत अटक करुन व्यापाऱ्यास न्याय देण्यात यावा.
या घटनेचा बोथ घेवून शासनाने शहरातील व्यापारी वर्ग व व्यापार पेठेस संरक्षण देण्यात यावे. सदरील वरील मागण्या मान्य झाल्या नाही तर व्यापारी महासंघ तालुका व्यापारी पेठ बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा प्रशासनास देण्यात येत आहे.
तरी या निवेदनाचे आपण आपल्या स्तरावर नोंद घ्यावी अशी ही विनंती केली आहे.
Discussion about this post