दौंड तालुका प्रतिनिधी-दौंड आज.ता.20 रोजी दौंड तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये खालील मागण्या करण्यात आल्या.
मराठा समाजाच्या मागण्या
१) सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करणे
२) हैदराबाद गॅजेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅजेट लागू करावे
३) कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे
४) संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे
५) शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम जलद गतीने करावे
६) मराठा व कुणबी एकच असल्याचे परिपत्रक शासनाने लवकरात लवकर काढावे
७) ई डब्ल्यू एस ,एस सी बीसी किंवा कुणबी हा पर्याय लवकरात लवकर अमलात आणावा.
इत्यादी मागण्या चे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले.
तहसीलदार साहेबांकडे मागणी
तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर मनोज दादा जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण थांबवण्यासाठी शासन पातळीवरती प्रयत्न करावेत व त्यांच्या सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी विनंती करण्यात आली.
सरकारला इशारा
त्याचबरोबर आखंड मराठा समाज दौंड तालुक्याच्या वतीने शासनाला दोन दिवसाचा वेळ दिला आहे त्यानंतर रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
पुढील आंदोलनाची दिशा
त्यामध्ये पुढील नियोजन आखण्यात आले आहे राष्ट्रीय महामार्ग रोको, रेल्वे रोको, सत्तेतील व विरोधी पक्षनेते यांना गाव बंदी, नेत्यांना घेराव, शासकीय कार्यालयातील काम बंद आंदोलन मराठा समाजातील मुले शाळा व कॉलेजमध्ये बहिष्कार टाकतील , मंत्रालयावर घंटा नाद,पायी पद यात्रा, जोपर्यंत आरक्षण लागू करण्यात येत नाही तोपर्यंत मंत्रालयाला घेराव व काम बंद आंदोलन करण्यात येईल
तहसीलदार साहेबांनी ही अखंड मराठा समाजाचे एकदम व्यवस्थित ऐकून घेतले व अखंड मराठा समाज दौंड यांचे सर्व म्हणणे लवकरात लवकर शासन दरबारी पोहोचले जाईल व न्याय लवकर मिळेल असे आश्वासन दिलं.
निवेदन देण्यासाठी बहुसंख्येने मराठा समाज उपस्थित
यावेळी राजाभाऊ तांबे, गणेश दिवेकर ,दादासाहेब माने, विकास शितोळे ,सुरेश तळेकर (गुरुजी), प्रशांत ताडगे, गणेश कुल, चंद्रकांत आखाडे ,राहुल दोरगे, दत्तात्रेय यादव ,प्रशांत दिवेकर, चंद्रकांत जगताप, सागर बरडे, शांताराम गायकवाड ,बाळासाहेब गायकवाड ,संजय पहाणे ,निलेश लोंढे ,सुधीर तांबे ,किरण सोनवणे, जितेंद्र साळुंके, प्रकाश देशमुख व इतर मराठा समाज बांधव उपस्थित होते.
Discussion about this post