⛔ इच्चलकरंजी येथील शिफा जमीरभाई बागवान M B B S च्या शिक्षणाकरिता रशियाला जाणार…
🎯 शिफा चे चुलते जावेदभाई बागवान यांच्याशी सारथी महाराष्ट्राचा चे आमीर मोहोळकर यांनी केली भ्रमणध्वनी वरून बातचीत…
आमीर मोहोळकर प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा न्यूज,अकलूज 9890299499
इच्चलकरंजी येथील शिफा जमीरभाई बागवान हि अत्यंत गुणी मुलगी M B B S शिक्षणासाठी रशिया येथे जाणार असल्याची माहिती सारथी महाराष्ट्राचा न्यूज चे आमीर मोहोळकर यांना मिळाली अन् अनेक ठिकाणी भ्रमणध्वनी वरून चौकशी केल्या नंतर जावेदभाई यांचा मोबाईल नंबर मिळाला आणि सर्व हकीकत जाणून टाइम्स 9 च्या वाचकांसाठी हा लेख….
तिच्यातले सामर्थ्य त्याने दाखवून दिले होते आता वेळ होती तिच्या स्वप्नाला पुर्ण करण्याचे…हि गोष्ट आहे इच्चलकरंजी येथील बागवान ट्रान्सपोर्ट चे सर्वेसर्वा बाबासाहेब बागवान यांच्या नातीची,जमीर बाबासाहेब बागवान यांची कन्या शिफा याचे 10 वी पर्यंत सर्व शिक्षण इंडो किड्स इंग्लिश स्कूल,कबनूर येथे झालेले तद्नंतर 11 वी आणि 12 वी चे शिक्षण चाटे कोचिंग क्लासेस येथे पुर्ण केले तर पुढील शिक्षण A S C कॉलेज येथे….
याच कॉलेज मध्ये सायन्स च्या दुसऱ्या वर्षी शिफा ने NEET ची परीक्षा दिली आणि ती कॉलिफाय झाली…डॉक्टर होण्याची प्रबळ इच्छा परंतु मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या शिफा ला M B B S च्या शिक्षणासाठी फी परवडणारी नसल्यामुळे तिची वाट जरा अंधारी च झाली होती परंतु घरातील प्रत्येक व्यक्तीने शिफा ला धीर दिल्यानंतर अंधारमय झालेली तिची वाट सुध्दा प्रकाशमय होताना दिसू लागली…
त्याचे झाले असे की,32 शिराळा येथील एका शिक्षकाने आपल्या मुलाचे M B B S साठी रशियाच्या एका कॉलेज मध्ये ॲडमिशन घेतले आहे असे कळल्यावर चाचा जावेदभाई यांनी शिफा सह सर्व लवाजमा घेत त्या शिक्षकाला अखेर गाठलेच…
पुर्ण चौकशी अंती हॉस्टेल भाडे,मेस,पासपोर्ट,व्हिजा,मेडिकल, इन्शुरन्स चा खर्च पाहता वार्षिक सहा लाख रुपये खर्च येणे अपेक्षित होते आणि M B B S च्या शिक्षणासाठी सहा वर्षे म्हणजे जवळ जवळ छत्तीस लाख रुपये खर्च अपेक्षित होता किंवा आहे…
त्या शिक्षकाची भेट घेऊन परत घरी आले नंतर घरातील प्रत्येकाशी “राय मशवरा” केला आणि घरातील प्रत्येक सदस्याने ठरवले की,काहीही झालं तरी शिफा ला डॉक्टर करण्यासाठी रशिया ला पाठवयाचच असं ठरल,अन मग लगेच तातडीने वीस हजार रुपये ऑनलाईन करुन रीसिट प्राप्त करुन घेतली…शिफा च्या पासपोर्ट साठी मामू अशरफ यांनी मोलाचे सहकार्य केले तर चाचा जावेदभाई यांनी अन्य कामासाठी पुणे आणि सोलापूर दौरा शिफा सह केला अन् सतराव्व्या दिवशी पासपोर्ट बाय पोस्ट घरी आले सुध्दा…इच्चलकरंजी येथील बागवान समाजातील एक मुलगी वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया येथे जाणार असल्यामुळे समाजात सुध्दा आनंदाचे वातावरण होते,समाजाचे अध्यक्ष बिश्पस इंग्लिश स्कूल चे चेअरमन हाजी कैसभाई बागवान आणि व्हा चेअरमन इम्तियाज म्हैशाळे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले…
शिफा ला निरोप देण्यासाठी त्याचे कुटुंबीय 22 सप्टें रोजी मुंबई येथे जाणार आहेत परंतु त्या आधी बाबासाहेब बागवान यांच्या घरी “ईद मिलन” कार्यक्रमा सारखी गर्दी पहायला मिळत आहे कारण काय तर एक मध्यमवर्गीय कुटुंबातील “होनहार” मुलगी रशिया ला निघालीय डॉक्टर व्हायला ते हि M B B S…
शिफा जमीरभाई बागवान यास “अल्लाह कामयाब करें” अशा सारथी महाराष्ट्राचा न्यूज च्या सुध्दा फार फार शुभेच्छा…


Discussion about this post