आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी शेकटे बुद्रुक ग्रामपंचायत वर असलेले वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन तात्पुरते स्थगित….
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2007 साली विहीर ज्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये खोदली होती. त्या शेतकऱ्याने त्या विहिरीवर संपूर्णपणे ताबा मिळवला होता. तो ताबा हटवण्यासाठी व विहिरीवर संपूर्णपणे ग्रामपंचायतीने ताबा मिळवून त्या विहिरीला तार कंपाऊंड करून ती विहीर ग्रामपंचायत च्या ताब्यात घेऊन वेळोवेळी गावामध्ये त्या विहिरीचे पाणी सोडावे यासाठी आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामपंचायत वर वंचित बहुजन आघाडी शाखा अध्यक्ष गणेश बोरुडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल भाई यांच्या नेतृत्वामध्ये बोंबाबोंब आंदोलन पुकारले होते.
याचे लेखी निवेदन माननीय तहसीलदार साहेब, माननीय गटविकास अधिकारी साहेब, तसेच पोलीस निरीक्षक शेवगाव, पोलीस उपनिरीक्षक बोधेगाव व ग्रामपंचायत शेकटे बुद्रुक यांना दिले होते.
आजचे आंदोलन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरू झाले. त्यानंतर आंदोलनाचे प्रास्ताविक शाखाध्यक्ष गणेश बोरुडे यांनी केले.
आज आंदोलन सुरू असताना त्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन त्या विहिरीवरचा ताबा सोडला व पाणी सोडण्यास आमचा विरोध नसल्याचे सांगुन लेखी दिले. त्याची हमी ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब व विस्तार अधिकारी शेळके साहेब यांनी घेतली.
म्हणून आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित केलेले आहे या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शेवगाव तालुका अध्यक्ष मा. संगीताताई ढवळे, शेकटे बुद्रुक शाखाध्यक्ष गणेश बोरुडे, उपाध्यक्ष राजू बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र फाटे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोरुडे, गोरक्षनाथ बोरुडे, लक्ष्मण बोरुडे, सुरेश बोरुडे, जालिंदर बोरुडे, सोनाजी बोरुडे, सुनील बोरुडे, भागवत बोरुडे, दुर्गाजी बोरुडे, भीमराव बोरुडे.
तसेच महिला भगिनी राणी बोरुडे, वर्ष बोरुडे, वंदना बोरुडे, कुसुम बोरुडे, छाया बोरुडे, उषा बोरुडे, कविता बोरुडे, शितल बोरुडे ,शांताबाई बोरुडे, जनाबाई बोरुडे, लक्ष्मीबाई बोरुडे,मनकर्णाबाई बोरुडे, केशरबाई बोरुडे रेऊबाई बोरुडे, वेणूबाई मिसाळ तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व उपस्थित आमचे आभार मानून आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित केलेले आहे.
Discussion about this post