
*स्वच्छता ही सेवा-२०२४ या मोहीमेला भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी व राष्ट्रीय सेवा योजनेचा स्फूर्त प्रतिसाद* भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पाळधी याठिकाणी स्वच्छता ही सेवा-२०२४ या मोहीमेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालया तर्फे आज दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालया बरोबरच गावातील बस स्थानक, PWD कार्यालयात परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र व श्रीराम मंदिर आणि बाजारपेठ परिसर इत्यादी प्रमुख स्थळांची स्वच्छता करण्यात आली. त्याबरोबरच बस स्थानकातील उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची शपथ देखिल देण्यात आली. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष श्री. विक्रमराव पाटील ,श्री प्रतापराव पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय व्ही बावीस्कर आणि रा.से.यो. सर्व स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मा. मंत्री महोदय श्री. गुलाबरावजी पाटील साहेब ( पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री जळगाव जिल्हा ) यांनी मोहिमेसाठी खुप सहकार्य करत या अभिनव मोहिमेचे भरभरून कौतुक केले.

Discussion about this post