सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
सवंदगाव येथील सौ. जयश्री वसंत बागुल यांना कर्तृत्ववान महिला म्हणून हा पुरस्कार दिला. सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यांनी आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला. तसेच बळ्हेगाव येथील श्री अनिल शांताराम सुर्यवंशी यांना आदर्श कृषी रत्न म्हणून हा पुरस्कार दिला. यांनी कृषी क्षेत्रात विशेष,उल्लेखनीय काम केल्याबद्दल या कार्याची दखल घेऊन माणुसकी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री विवेक राजापुरे यांनी या पुरस्काराचे वितरण केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत विठ्ठल पाटील( सेवा तीर्थ धाम वृद्धाश्रम दाताळा ता.मलकापूर ), प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय रंगनाथ हरबडे( वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र परभणी ), संगीता कृष्णदेव गुरव ( ज्येष्ठ उद्योजिका वेदांत महिला उद्योग ठाणे ), सचिन भाऊ भन्साली ( अध्यक्ष ओम शांती सेवा समिती मलकापूर ) यांची प्रमुख उपस्थित होती. तसेच संभाजीनगर, नाशिक, यवतमाळ,बीड, जळगाव, अमळनेर या भागातील पुरस्कारार्थी उपस्थित होती.
Discussion about this post