


भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू
शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणातून व्यवसाय व रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे या संकल्पनेतून भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना करण्यात आली.

यात सुरुवातीला तीन कोर्सची सुरुवात करण्यात आली असून. त्यात आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी जी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच कौशल्य विकास,नाविन्यता, रोजगार, उद्योजकता मंत्री, तसेच लोकसभा, विधानसभा सदस्य यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दृकश्राव्य प्रणाली द्वारे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी मा.ना. भाऊसौ श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब विक्रम गुलाबरावजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील. यांनी उपस्थिती लावली. व पाळधी येथील सरपंच सौ.लक्ष्मीताई शरद कोळी तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री.यु.के. फासे सर माध्यमिक विद्यालय चे हे मुख्याध्यापक मा. डी. डी.कंखरे सर सर इंग्लिश मीडियम चे प्रिन्सिपल मा.श्री नरेंद्र मांडगे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. व मोठ्या संख्येत पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post