राळेगाव तालुका प्रतिनिधी- अरविंद कोडापे
राळेगाव तालुक्यातील वडकी विज वितरण विभागाच्या लंपडावामुळे विहिरगाव सह परिसरातील ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे
वडकी विज वितरण विभागाच्या लपंडावामुळे ग्रामीण भागातील जनता ही दोन वर्षा पासून त्रस्त झाली आहे असल्याचे दिसून येत आहे वडकी विज वितरण विभाग हे येत्रना फक्त बिल वसुल करण्यातच माहीर आहे परंतु सेवा देण्यात झिरो झाली आहे तर अश्या लपंडावामुळे काही दिवसांपूर्वी एका संताप शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच बदाडले होते परंतु येथील अभियंत्रणा व कर्मच्याऱ्यावर त्यांच्या कुठल्याही फरक पडला नाही आजही तिच परस्तिती येते की काय असा अंताप शेतकरी व शेतमजुरा मध्ये दिसत आहे रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा वारा पाऊस नसताना सुद्धा दहा दहा घन्टे लाईट बंद ठेवणे व शेतकरी व शेतमंजूर यांना नाहक त्रास देणे हा प्रकार सध्या वडकीत विभागाच्या अधिकाऱ्यामुळे सुरु आहे .
आत्ता शेतकऱ्यांना सोयाबीन व कपाशीला पाणी देण्याची गरज आहे अशातच दिवसा मधून दहा वेळा लाईट जाने हे शेतकऱ्याची डोखे दुखी झाली आहे नव्याने रुजू झालेले सहाय्यक अभियंता नागपुरे हे तरी शेतकऱ्यांना दिवसाला सुरळीत विज पुरवठा देतील का व शेतकऱ्यांना शेतमजुराणा रात्रीची सुखाची झोप येऊ देईल का असे शेतकरी शेतमजुरा मध्ये बोल्या जात आहे.
Discussion about this post