प्रतिनिधी:- आनंद संजय करळे परंडा तालुका
मराठा आरक्षणाच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजणारे असंख्य भेटतात, पण आपल्या परंडा तालुक्यातील एक सर्वसामान्य मराठा कुटुंबातील मराठा सेवक राजकुमार गायकवाड रा. नालगांव ता.परंडा मनोज दादांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी दोन दिवसापासून परंडा तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत.
या अगोदरही त्यांनी साखळी उपोषणावेळी नालगाव येथे सलग 9 दिवस उपोषण केले. त्यानंतर धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग 7 दिवस आमरण उपोषण केले. नंतर मनोजदादांच्या आदेशावरून त्यांनी उपोषण सोडले.
दोन दिवसापासून ते पुन्हा उपोषण करत आहेत. सकल मराठा समाज, परंडा तालुका यांना विनंती आहे त्यांनी राजकुमार गायकवाड यांना सर्वोपरी मदत करावी.
Discussion about this post