परंडा तालुका प्रतिनिधी:- परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेफळ येथे शाळेच्या इमारती भोवती वाढलेले उंच व दाट गवत काढण्यासाठी गावकऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने श्रमदान केले.
वरील काम हाती घेण्यापूर्वी उद्या सकाळी सहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेफळ येथे शाळेच्या सभोवताली वाढलेले गवत काढणे व साफसफाई करणे यासाठी श्रमदान करण्याचे आवाहन एका ग्रुपवर पोस्ट टाकून करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत हे काम करण्यात आले.
मुलांच्या सुरक्षतेसाठी व शाळेच्या कंपौंडच्या कडेने लावलेली अशोकाची झाडे संवर्धन करण्यासाठी एक मदत म्हणून हे काम हाती घेण्यात आले.आम्हाला शाळेत समाजसेवेचे धडे मिळाले त्यामुळे आम्ही हे काम हाती घेतले अशी भावना शाळेचे माझी विद्यार्थी व गावकऱ्यांनी व्यक्त केली.
वरील काम करण्यासाठी जोतीराम गिरवले, राम नुसते, महादेव जाधव, देवा भांडवलकर, अजय ढाळे यांनी परिश्रम घेतले.
वरील कामासाठी योगदान दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका भोसले मॅडम, हुशेनी मॅडम,मिरा नुसते मॅडम,चींचोडिकर सर यांनी समाजसेवेच्या भावनेतून केलेल्या कामाचे कौतुक केले.
Discussion about this post