
पालघर,नानिवली येथे दि.२५ सप्टेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष श्री.रमेशजी सवरा यांच्या राहत्या घरी शूर झलकारी कातकरी एकता महासंघ महाराष्ट्र राज्य. संघटने मार्फत कार्यक्रम घेण्यात आला.या सभेत सर्व प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पालघर जिल्ह्यात अनेक गावातील कातकरी वस्तीत असलेल्या लोकांचा सहभाग होता.संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष रमेश जी सवरा यांनी समस्या विषयावर चर्चा केली.व लोकांना मोलाचे असे बऱ्याच विषयांना धरून मार्गदर्शन करण्यात आले.

पालघर जिल्ह्यात कातकरी समाजाला भेडसावणाऱ्या समस्या कुपोषण, स्थलांतर, सुशिक्षित बेरोजगारांना कसा रोजगार मिळवून देता येईल, घरकूल योजना पासून वंचित घटक राहणार नाही. तसेच एक जिल्हा एक योजना उपक्रम राबवण्या वर चर्चा करण्यात आली. कातकरी समुदाय मागे राहू नये. तसेच आराध्या दैवत क्रांतिकारक हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृती दिना निमित्त आज शूर झलकारी कातकरी एकता महासंघ महाराष्ट्र राज्य.संघटनेच्या मार्फत संघटना बांधणी करून तालुका कमिटी अध्यक्ष, गाव कमिटी अध्यक्ष यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र वितरित करण्यात आले.

सभेत उपस्थित शूर झलकारी कातकरी एकता महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.रमेशजी सवरा, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री. विजय शिसव, पालघर जिल्हा सचिव श्री.शिवराम मुकणे, उपाध्यक्ष श्री. रतीलाल आरडी, श्री. शिलिंग लहांगे, डहाणू तालुका अध्यक्ष श्री.गणेश गावित, सचिव श्री.दिलीप पवार, सहसचिव श्री.अनिश मिसाळ, सल्लागार श्री.देऊ गावित, काळूराम घाटाळ, तसेच पालघर तालुका कमिटी अध्यक्ष श्री.सुनिल पवार, सचिव श्री.किरण पवार, तसेच सर्व गाव कमिटी अध्यक्ष, सचिव, आणि सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

Discussion about this post