• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एम.एस.जी.एस.शिक्षण संकुलाचे श्री अमोल सोनवने यांचे देशाबाहेरील शेती अभ्यास दौरा युरोप साठी निवड झाल्याबद्दल सन्मान.

by
February 13, 2026
in Blog
0
एम.एस.जी.एस.शिक्षण संकुलाचे श्री अमोल सोनवने यांचे देशाबाहेरील शेती अभ्यास दौरा युरोप साठी निवड झाल्याबद्दल सन्मान.
0
SHARES
216
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

एम.एस.जी.एस.शिक्षण संकुलाचे श्री.अमोल सोनवणे यांचे देशाबाहेरील शेती अभ्यासदौरा युरोप साठी निवड झाल्याबद्दल सन्मान.
राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत युरोप (टप्पा २) अभ्यासदौऱ्या करिता
अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शिक्षण संकुलाचे सरचिटणीस, प्रगतीशील शेतकरी श्री.अमोल सुभाष सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळातर्फे सन्मान व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी श्री.अमोल सुभाष सोनवणे व श्री.संतोष गोसावी सहायक कृषी अधिकारी,अंदरसूल हे तर अध्यक्षस्थानी अरुण भांडगे हे होते.कार्यक्रमाची सुरुवात श्री.अमोल सोनवणे यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षक अमोल आहेर यांनी केली. यानंतर संकुलाच्या वतीने श्री.अमोल सुभाष सोनवणे व श्री.संतोष गोसावी यांचा सत्कार करण्यात आला आला.
सदर अभ्यास दौऱ्यासाठी नाशिक जिल्ह्यातून एकूण २ प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती.त्यात अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस श्री.अमोल सोनवणे यांची निवड करण्यात आली. तसेच सदर अभ्यास दौऱ्यासाठी श्री.अमोल सोनवणे हे पॅरिस, फ्रान्स, स्विझरलँड, माउंट टिटलिस प्रदेश, झियुरिक, स्टुटगार्ट– जर्मनी, आम्सटरडॅम नेदरलँड्स इ. देशात गहू, बार्ली, कॉर्न लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी, खाद्य प्रणाली, आधुनिक दूध उत्पादन पद्धतींचे निरिक्षणासाठी डेरी फॉर्मला भेट, पॅरिस शहरातील पायाभूत सुविधांचा अनुभव, सेंद्रीय शेती, रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑरगॅनिक ॲग्रिकलचरला भेट, पर्वतीय शेती, अल्पलाइन फेरी फॉर्म भेट, होहेनहाइम जर्मनी येथील विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र भेट, आंतरराष्ट्रीय फुलांचा व्यापार, आणि लॉजिस्टिक्सचा अभ्यास, अल्समीर फ्लॉवर मार्केटला भेट, तसेच प्रायोगिक शेती / फलोत्पादन केंद्राला भेट इ. ठिकाणी अभ्यास दौरा होणार आहे. याचे पूर्ण महाराष्ट्र तसेच भारत देशाला शेतीची नवी दिशा मिळणार आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संतोष जाधव, प्रशासकीय अधिकारी प्रा.आर.बी. गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी शेती अभ्यास दौऱ्यासाठी अमोल सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अंदरसूल ग्रामपालिका माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ.विनिता अमोल सोनवणे, संचालक जीवन गाडे, उज्ज्वल जाधव ,जनार्दन जानराव, रामनाथ काका एंडाईत, भागीनाथ थोरात, सचिन बागुल, संदीप वाकचौरे, मंगेश शिंदे, इंग्लिश मीडियमचे प्रिंसिपल अल्ताफ खान, ज्यु.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, सिनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सुवर्णा कडलक, गणेश सोनवणे, अजिम पटेल, राजेश कांबळे, सचिन घोड़के, सुनील सपकाळ, शिवप्रसाद शिरसाठ, मयूर भागवत, महेश मेहेत्रे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनिता वडे, शोभा निकम, दीपाली सोनवणे, सुषमा सोनवणे, आरती राजपूत, पूजा जाधव, आदी सह सर्व शिक्षक -शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अजहर खतीब यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक दीपक खैरनार यांनी केले.

Previous Post

महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा महोत्सव

Next Post

जैतापूर इंग्रजी पेपरमध्ये सामूहिक कॉपीचा दोषींवर निलंबन!

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
4
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
जैतापूर इंग्रजी पेपरमध्ये सामूहिक कॉपीचा दोषींवर निलंबन!

जैतापूर इंग्रजी पेपरमध्ये सामूहिक कॉपीचा दोषींवर निलंबन!

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In