• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 7, 2026
in Blog
0
महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सासकल व धुमाळवाडी येथे ७११ अर्जांचे संकलन; ग्रामसभेची मान्यता मिळवून प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान

सासकल : प्रतिनिधी

RelatedPosts

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्ज संकलन, ग्रामसभेची मान्यता आणि प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सासकल येथील कृषी सेवारत्न तथा सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कामगिरीत त्यांनी फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांच्या वतीने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सचिन जाधव यांनी सासकल येथे ४१२, तर महाराष्ट्र राज्यातील पहिले ‘फळांचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या धुमाळवाडी येथे २९९ असे एकूण ७११ महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्ज संकलित केले. या अर्जांना २ ऑक्टोबर रोजी आयोजित ग्रामसभांमध्ये मान्यता मिळवून देत प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

महिला शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील अधिकृत ओळख मिळवून देणे, त्यांना विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी सक्षम करणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उद्देशपूर्तीसाठी सचिन जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची कृषी विभागाने दखल घेत त्यांचा गौरव केला.

या यशाबद्दल सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील (IAS), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा अजय शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी विडणी अजित सोनवलकर तसेच कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी वर्गातून सचिन जाधव यांचे अभिनंदन होत आहे.

Ad 1
Previous Post

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

Related Posts

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!
Blog

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
42
सगळ्यांसाठी जगलेला माणूस…
Blog

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

November 6, 2026
35
भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!
Blog

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
19
तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश
Blog

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026
73
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
7
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!
Blog

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026
44

ताज्या बातम्या

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

November 7, 2026
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In