• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भेडशी येथे ८ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाचा जल्लोष; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 7, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

१४ नोव्हेंबरपर्यंत रंगणार सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रम; रांगोळी, चित्रकला, पाककला, होम मिनिस्टरसह नाटकाचे आयोजन

दोडामार्ग :

RelatedPosts

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

भेडशी येथील श्री दामोदर दीपोत्सव समिती व ग्रामस्थ भेडशी यांच्या वतीने यंदाही दीपोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ८ नोव्हेंबर ते शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा दीपोत्सव उत्साहात साजरा होणार असून, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची पर्वणी उपलब्ध होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. रविवार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता लॉटरी सोडतीने दीपोत्सवाच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता लहान व मोठ्या गटांसाठी रांगोळी स्पर्धा, तर मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पाककला स्पर्धा, रात्री ९ वाजता लहान व मोठ्या गटांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि रात्री १० वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा रंगणार आहे. गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता व्हेजिटेबल स्पर्धा, तर रात्री १० वाजता रसिक प्रेक्षकांसाठी मराठी विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता महिलांसाठी खास लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम होणार आहे. तर शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन

विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी कु. महेश वर्दम, कु. निखिल जुवेकर, निलेश तळणकर, सौ. शोभना जुवेकर व कु. निशिगंधा भुजंगे यांच्याकडे आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच भेडशी परिसरातील नागरिक, महिला मंडळे, युवक आणि बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दीपोत्सवातील विविध कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री दामोदर दीपोत्सव समिती व ग्रामस्थ भेडशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

Related Posts

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!
Blog

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

November 7, 2026
1
ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!
Blog

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
42
सगळ्यांसाठी जगलेला माणूस…
Blog

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

November 6, 2026
35
भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!
Blog

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
19
तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश
Blog

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026
73
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
7

ताज्या बातम्या

भेडशी येथे ८ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाचा जल्लोष; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

November 7, 2026
महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

November 7, 2026
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In