• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; ४४९ उमेदवारांची उपस्थिती, ४७ अपात्र…

by
February 13, 2026
in Blog
0
लातूर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; ४४९ उमेदवारांची उपस्थिती, ४७ अपात्र…
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

लातूर प्रतिनिधी :लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ अंतर्गत “शारीरिक मोजमाप व शारीरिक मैदानी चाचणी” प्रक्रियेला शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजता पोलीस मुख्यालय, बाभळगाव (लातूर) येथे सुरुवात झाली आहे. भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने उमेदवारांना बोलावण्यात आले होते.पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ फेब्रुवारी रोजी एकूण ८४९ पुरुष उमेदवारांना शारीरिक मोजमाप व चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

मात्र त्यापैकी ४४९ उमेदवार प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी झाले असून ४०० उमेदवार गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.भरती प्रक्रियेस उपस्थित असलेल्या ४४९ उमेदवारांपैकी ४७ उमेदवार शारीरिक मोजमाप चाचणीत अपात्र ठरले. उर्वरित ४०२ उमेदवारांना १६०० मीटर धावणे, १०० मीटर स्प्रिंट आणि गोळाफेक अशा मैदानी चाचणीसाठी पात्र घोषित करण्यात आले. या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये मिळालेल्या गुणांची यादी लातूर पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस मुख्यालयाच्या दर्शनी भागावरही ती लावण्यात आली आहे.दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणयादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी ४८ तासांच्या आत लेखी स्वरूपात ई-मेलद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालयात नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ठरलेल्या वेळेनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पोलीस भरतीच्या पुढील टप्प्यात दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी चालक पोलीस शिपाई पदासाठी येणाऱ्या उमेदवारांनी पहाटे ४ वाजता पोलीस मुख्यालय, बाभळगाव येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र, ऑनलाईन अर्जाची प्रत, वाहन परवाना, चार पासपोर्ट साईज फोटो तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा अन्य ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत मैदानावर हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक अमोल श्री. तांबे यांनी उमेदवारांना सूचित केले आहे की, शारीरिक मोजमाप चाचणीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच पुढील मैदानी क्षमता चाचणीत सहभागी होता येईल. त्यामुळे उमेदवारांनी पूर्ण प्रक्रियेपर्यंत मुख्यालयात उपस्थित राहण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

जिद्द आणि चिकाटीचे फळ! कु. सायली शेलार यांची ‘कृषि उपसंचालक’ Class 1 पदी निवड; महाराष्ट्रात सहावा क्रमांक

Next Post

महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमंत्रण

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
5
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमंत्रण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In