• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरणास प्रशासकीय मान्यता; ४८ कोटींच्या खर्चास हिरवा कंदील

by
February 14, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्र न्यूज | सावनेर प्रतिनिधी :
शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ | खापरखेड़ा

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत विभागाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील नागरिकांना जुन्या, कागदी व हाताळण्यास अवघड शिधापत्रिकांऐवजी आधुनिक QR कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व शिधापत्रिकाधारकांना नवीन स्मार्ट शिधापत्रिका देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर स्मार्ट शिधापत्रिका प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. समितीने या प्रकल्पास तसेच त्यासाठी लागणाऱ्या अंदाजित ४८ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. या निर्णयास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून संबंधित खर्च लेखाशिर्ष मागणी क्र. एम-३, ३४५१ सचिवालय आर्थिक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण राज्य योजना कार्यक्रम संगणक खर्च या अंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे.

स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याची कार्यवाही निविदा पद्धतीने करण्यात येईल. खरेदी प्रक्रिया उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने निश्चित केलेल्या नियमपुस्तिकेनुसार पार पाडली जाणार आहे. तसेच सर्व खर्च शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अधीन राहून व वित्तीय नियमांचे पालन करून करण्यात येईल.

सदर निर्णय Government of Maharashtra यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. या संदर्भात Food Civil Supplies and Consumer Protection Department Maharashtra मंत्रालयामार्फत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

राज्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, टिकाऊ व पारदर्शक सेवा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Previous Post

धनादेशावर बनावट स्वाक्षरीने २.१९ लाखांचा विड्राॅल?

Next Post

आढीव जिल्हापरिषद शाळा येथे भरला आनंद बाजार डे …..!

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
35
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

आढीव जिल्हापरिषद शाळा येथे भरला आनंद बाजार डे .....!

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In