• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागवे गावचे ग्रामदैवत “श्री देव नागेश्वर” प्रथमच जाणार श्री देव कुणकेश्वर यांच्या भेटीला

by
February 14, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

कणकवली तालुका प्रतिनिधी | अमित तेंडुलकर

नागवे ग्रामस्थांचा पहिल्यांदाच सहपरिवार देवता दर्शन सोहळा.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कणकवली : कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र कुणकेश्वराच्या चरणी यावर्षी एक ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे. नागवे गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर आपल्या संपूर्ण देव-परिवार, पंचतरंग आणि लवाजम्यासह रविवारी १५ फेब्रुवारी (महाशिवरात्री) रोजी श्री देव कुणकेश्वर महास्थानच्या भेटीला जाणार आहेत.

नागवे ग्रामस्थांच्या इतिहासात प्रथमच हा नयनरम्य सोहळा संपन्न होत असल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी गेल्या चार दिवसापूर्वी श्री देव नागेश्वर मंदिरात ठराविक ग्रामस्थांची सभा झाली सर्वांच्या उपस्थितीत यात्रेचा आराखडा सर्वांच्या ऐपतीप्रमाणे यात्रेसाठी होणारा खर्च देणगी देण्याचे निश्चित केला गेलेला आहे. प्रवासाची व्यवस्था, दोन दिवस सोबत जाणाऱ्यांची राहण्याची आणि भोजन व्यवस्थे बाबत चोख नियोजन करण्यात आले आहे.

नागवे गावच्या देवता प्रथमच अधिकृतपणे श्री देव कुणकेश्वर भेटीला प्रस्थान करणार आहेत.
हा दर्शन सोहळा १५ ते १७ फेब्रुवारी असा तीन दिवस चालणार असून, यामध्ये हजारो महादेव भक्त भाविक सहभागी होणार आहेत.
रविवार १५ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता श्री देव नागेश्वर मंदिरातून श्री देव कुणकेश्वर दर्शन यात्रेचा प्रारंभ होणार आहे. १५ व १६ फेब्रुवारीला तीर्थक्षेत्री वास्तव असणार आहे. मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी पहाटे देवतांचे व भाविकांचे पवित्र तीर्थस्नान होऊन श्री देव कुणकेश्वर दर्शन होईल. त्यानंतर दुपारी सोबत गेलेल्या सर्व भाविकांचा महाप्रसाद झाल्यानंतर श्री देव नागेश्वर सह परिवार देवता, यात्रेची सांगता नागवे या गावी मूळ ठिकाणी श्री देव नागेश्वर मंदिरात होणार आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्री देव कुणकेश्वर दर्शनासाठी श्री नागेश्वर देवस्थानचा विशेष ‘ आणि “टोपी” देण्यात येणार आहे.

विशेष सुचना आपल्या देवतांसोबत चालणे हा भाग्याचा ठेवा आहे. या यात्रेदरम्यान सर्व भाविकांनी नागवे गावाची आणि देवस्थानची प्रतिष्ठा जपून शिस्तबद्ध रितीने कसलाही तंटा क्लेश न करता दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री देव नागेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट व पुढारी यांच्यावतीने सर्वांना करण्यात आले आहे.

Previous Post

कन्नड: नागद शिवारात बिबट्याचा हल्ला;

Next Post

CCTV व कॉम्प्युटर वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
5
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
CCTV व कॉम्प्युटर वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

CCTV व कॉम्प्युटर वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In