• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘संतांच्या विचारातच आनंदी जीवनाचे रहस्य’.. कवी प्रा. ऋषिकेश खारगे

by
February 14, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी / प्रा. संदीप पाटील

मालती पाटील कन्या महाविद्यालयात स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा…

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

‘आईची सामर्थ्यता म्हणजेच मालती महाविद्यालय होय.ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाच्या आयुष्याला आकार देते. त्याला संस्काराचे बाळकडू पाजते आणि संकटात आधार देते. अगदी तसेच कार्य हे महाविद्यालय विद्यार्थिनींच्या जीवनाला आकार देत आहे. मुलींनो तुम्ही खूप भाग्यवान आहात अशा संस्काररूपी महाविद्यालयात शिकत आहात. कारण बदलत्या काळानुसार आज प्रगती झाली असली तरी मनाचा मोठेपणा कमी झाला आहे. संतांच्या विचारांची कास धरून आनंदाने जगण्याची गरज आहे’ असे प्रतिपादन कीर्तनकार कवी.प्रा. ऋषिकेश खारगे यांनी केले.

येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्या, प्रा.सौ.हर्षाली पाटील अध्यक्षस्थानी होत्या. प्राचार्या.शीतल पाटील,प्रा. डॉ. मेघा संजय पाटील, कवयित्री. सिंधुताई कचरे , प्रमुख उपस्थित होते.

पुढे म्हणाले की ‘महाराष्ट्राला संतांची पुरोगामी परंपरा लाभली आहे. भौतिक सुखाच्या मागे धावताना मानवी जीवनातील खरा आनंद दुरापास्त झाला आहे. त्यांनी आपल्या ‘प्रीतीचे गुज, आई ,वैषाखाच्या झळा, काळजावरचे घाव,आनंदाचे झाड या कविता वाचनातून माणसाने निखळ प्रेम करायला आईकडून शिकावे, आपली नाळ मातीशी घट्ट जोडलेली असावी, मुलगी जन्माला येते तेव्हा आई जन्माला येते, असे समजावे आई-वडिलांच्या सेवेतच ईश्वराचे दर्शन लपलेले आहे. त्यांनी आपल्या कवितातून कधी हसत हसत… कधी गंभीर बनवत हा कार्यक्रम दिमाखदार बनविला.

अध्यक्षीय मनोगतात प्रा. हर्षाली पाटील यांनी मुलीनीआत्मनिर्भर व आर्थिक साक्षर होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे. संस्कृती जपा फसव्या अमिषापासून दूर राहण्याचे आवाहन केले.’उज्वला पांडुरंग सूर्यवंशी.यांना महाविद्यालयाचा मानाचा मालती माता पुरस्कार रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार कला विभागातून कु.रंभा शर्मा व वाणिज्य विभागातून कु.कल्याणी साळुंखे यांना दिला.

महाविद्यालयातील प्राध्यापकानी विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. क्रीडा ,सांस्कृतिक, शिष्यवृत्तीधारक,एन.एस.एस विभागात विशेष गुणवत्ता मिळवल्या बद्दल विद्यार्थिनींचा सन्मान केला.

प्राचार्य. डॉ. अंकुश बेलवटकर यांनी स्वागत व प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील आढावा घेतला. कार्याध्यक्षा प्रो.डॉ.शीला रत्नाकर यांनी अहवाल वाचन केले. या कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थिनी पालक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण, प्रा. स्वाती चौधरी यांनी केले व आभार प्रा. निलेश डामसे यांनी मानले.

Previous Post

🟦 भादवण हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात शुभेच्छा समारंभ

Next Post

महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे सोय नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे जुनी मिल येथील उमानागरी वसाहत

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
5
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे सोय नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे जुनी मिल येथील उमानागरी वसाहत

महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे सोय नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे जुनी मिल येथील उमानागरी वसाहत

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In