• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किल्ले धारूर येथे ३७ वा सार्वजनिक शिवजयंती उत्सव : सामाजिक, आरोग्य व सांस्कृतिक उपक्रमांनी होणार साजरा

by
February 14, 2026
in Blog
0
किल्ले धारूर येथे ३७ वा सार्वजनिक शिवजयंती उत्सव : सामाजिक, आरोग्य व सांस्कृतिक उपक्रमांनी होणार साजरा
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

किल्ले धारूर प्रतिनिधी:विष्णु लांडगे

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, किल्ले धारूर यांच्या वतीने यंदा १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असून हा उत्सव यावर्षी ३७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेली तीन दशके संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नामदेवरावजी शिनगारे यांनी सुरू केलेली ही परंपरा शिवप्रेमींनी अखंडपणे जपली असून सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांद्वारे गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात समितीचे मोठे योगदान आहे.यंदाच्या शिवजयंतीनिमित्त रवी विजय हॉस्पिटल यांच्या विद्यमाने भव्य सर्वरोग निदान व महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रणवीर हॉस्पिटल, जुन्या हैदराबाद बँक शेजारी, किल्ले धारूर येथे होणार असून डॉ.भाग्यश्री सावंत, डॉ. ऐश्वर्या सावंत व डॉ. मयूर सावंत यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नागरिकांना आरोग्य सेवा देणार आहे. या शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.उत्सवानिमित्त सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते १० या वेळेत सुप्रसिद्ध शिवचरित्रकार ह.भ.प. डॉ. प्रवीण महाराज दुशिंग (झी टॉकीज प्रेम वैजापूर) यांचे शिवचरित्रावर मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ ते १० या वेळेत समाजप्रबोधनकार ह.भ.प. गणेश महाराज गवारे (जालना) यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.मुख्य शिवजयंती दिनी गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता चावडी कसबा विभाग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. संध्याकाळी ५ वाजता कसबा विभागातून सुरू होणारी भव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांती चौक, काशिनाथ चौक, नगरपरिषद परिसर व जावळीकर व इतर विभागांमधून मार्गक्रमण करणार आहे. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणून कोल्हापूर येथील शिवशंभू मर्दानी खेळ पथक आपले सादरीकरण करणार आहे.सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून गेली ३७ वर्षे गावामध्ये सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, विविध स्पर्धा आणि गरजूंना मदतीचे कार्य सातत्याने सुरू आहे. संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नामदेवराव शिनगारे यांनी रुजवलेली ही परंपरा शिवप्रेमींनी निष्ठेने पुढे नेली असून आगामी काळातही समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला आहे.यंदाच्या शिवजयंती उत्सवामुळे किल्ले धारूरमध्ये शिवभक्तीचे आणि सामाजिक एकतेचे वातावरण निर्माण होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमांना यशस्वी करावे, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती च्या उत्सव समितीने केले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Previous Post

आढीव जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार डे….

Next Post

🟢 राजकारण संपले, आता समाजकारण : हुडे ता. आजरा,गावचा विकासोन्मुख आदर्श!

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
5
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
🟢 राजकारण संपले, आता समाजकारण : हुडे ता. आजरा,गावचा विकासोन्मुख आदर्श!

🟢 राजकारण संपले, आता समाजकारण : हुडे ता. आजरा,गावचा विकासोन्मुख आदर्श!

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In