हातकणंगले तालुका प्रतिनिधी 🙁 हुपरी)
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी तळागाळापर्यंत पोहोचत असताना काही उनिवा अडचणी किंवा लाभ न मिळणे अशा तांत्रिक अडचणी पार करून सामान्य महिलांच्या पर्यंत योजना पोहोचविण्याचे काम अंगणवाडी सेविका व महा-ई-सेवा केंद्र मार्फत सुरू आहे.
योजनेबद्दल आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कुटुंब अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महिले शी संपर्क साधून योजनेबद्दल अभिप्राय घेतला जात आहे. त्यासाठीच हुपरी गावचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच गोकुळ दूध संघ संचालक माननीय श्री मुरलीधर रघुनाथ जाधव यांचे चिरंजीव श्री शिवाजी मुरलीधर जाधव युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्येक कुटुंबांमध्ये जाऊन हातकणंगले तालुका शिरोळ तालुका शाहूवाडी तालुका तसेच मतदार संघातील अन्य गावांमध्ये भेटी देत आहेत.
योजनेबद्दल संपूर्ण माहिती महिलांना देऊन अजून ज्या महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांना योजनेबद्दल माहिती देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य माननीय श्री शिवाजी मुरलीधर जाधव हे करीत आहेत. त्यांच्यासोबत युवा सेनेचे अन्य कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सहभागी राहून हा उपक्रम यशस्वीरित्या पार करण्याचे प्रयत्न करत आहेत. अशी माहिती युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य माननीय श्री शिवाजी मुरलीधर जाधव यांनी दिली.
Discussion about this post