✈️🚀#सोलापूर #विमानतळ नूतनीकरणाचे उदघाटन आज ऑनलाईन पद्धतीने आपल्या मा.पंतप्रधान साहेबांच्या हस्ते होणार होते.सर्वांचे मनस्वी अभिनंदन💐

विमानसेवा सुरु करण्यासाठी गेली अनेक वर्ष पहिल्या दिवसापासून आपल्या भूमिकेवर ठाम राहून स्वखर्चाने प्रामाणिक काम करणाऱ्या,अनेक हेलपाटे मारून,अनेकांच्या शिव्या-धमक्या खाऊनही ध्येयापासून न हटणाऱ्या सोलापूर विकास मंच सदस्य व साथ दिलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकांचे मनस्वी आभार.खरे श्रेय यांचे आहे.यश टप्प्यात येतेय असं दिसल्यावर त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी व ते तडीस नेण्यासाठी साथ दिलेल्या प्रत्येक राजकारणी मान्यवराचेही मनापासून आभार.कारण त्यांच्या साथीने याला व्यापक स्वरूप आले आणि काम फत्ते झाले.याबाबतीत घडलेल्या प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगात ज्यांची भक्कम साथ लाभली ते जिल्ह्यातील सामान्य शेतकरी,सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस दल,SRPF दल,सोलापूर जिल्हा प्रशासन(महानगरपालिका आणि कलेक्टर ऑफिस)तसेच तत्कालीन पण आता बदली होऊन गेलेले अधिकारी गण,पत्रकार-मीडिया,मंत्रालयातील अनेक अभ्यासू अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.प्रत्येकाचे मनस्वी आभार.हे श्रेय या प्रत्येकाचे आहे.🇮🇳🙏🏻भक्ती जाधव जलकन्या 💦💦🚩
Discussion about this post