प्रतिनिधी: सुधीर घाटाळ

डहाणू, महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना अनेक विधानसभे मध्ये निरनिराळ्या पद्धतीचे कार्यक्रम केले जात असतात तसाच डहाणू तालुक्यातील पालघर विधानसभेत गंजाड व कासा या ठिकाणी बहुजन विकास आघाडी पुरस्कृत रिक्षा चालक मालक युनियन फलकांचे अनावरण झाले.

दि.26 नोव्हेंबर रोजी डहाणू जव्हार मुख्य रस्त्यावर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत चालक मालक मित्र मंडळ पालघर जिल्हा यांच्या वतीने गंजाड , वधना ,कासा असे तीन ठिकाणी बोईसर विधानसभा मा. श्री. राजेश पाटिल साहेब यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला.
रिक्षा युनियन बनवण्याचे मुख्य उद्देश एकत्रित येऊन एक मेकांना सहकार्य करणे, प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम व रोजगार मिळेल तसेच प्रत्येक कामात येणारे व अडी अडचणीला धावून येण्याचे असे साधन म्हणजेच रिक्षा आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित प्रमुख बविआ पक्षाचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोक भोईर, आदिवासी आघाडी अध्यक्ष प्रसाद पऱ्हाड, पालघर विधानसभा प्रमुख अध्यक्ष सुरेश पाडवी, आदिवासी सेल आघाडीचे उपाध्यक्ष श्री.अभिजित देसक, तालुका अध्यक्ष अरुण निकोले, युवा नेते आनंद ठाकूर,सरपंच नितेश भोईर,उपसरपंच कौशल कामडी,उपसरपंच सुदाम मेरे, शूर झलकरी कातकरी महा.राज्य डहाणू तालुका अध्यक्ष गणेश गावित आदी.

गंजाड युनियनचे अध्यक्ष प्रविण वरठा, उपाध्यक्ष संदिप दळवी, सचिव कैलाश भंडार, खजिनदार नवश्या (नरेश)लाखात, संघटक शिवराम वरखंडे, वधना युनियन अध्यक्ष तुषार वरखंडे, उपाध्यक्ष प्रमोद म्हसकर, सचिव भालचंद्र करमोडा, खजिनदार प्रकाश वरठा, संघटक प्रकाश राजड सर्व रिक्षा चालक मालक व सभासद उपस्थित होते.

Discussion about this post