8 Total Views , 1 views today

प्रतिनिधी :- राजेंद्र शिंदे
इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील तरुण शुभम ओमप्रकाश खराडे, वय 28 वर्षे,याने आपल्या राहत्या घराजवळ तारीख 26/09/2024 रोजी 07.45 वा. च्या सुमारास रहाते घराचे पाठीमागील लिंबाचे झाडास सुताचे दोरीने गळफास घेत. आपली जीवनयात्रा संपवली.
त्यांनंतर त्याचा छोटा भाऊ व नातेवाईक यांनी मिळून शुभम याला ग्रामीण रुग्णालय भिगवण येथे घेवुन आले तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन मयत घोषीत केले. हे वृत्त भिगवण परिसरात समजताच त्याचे मित्र परिवाराने मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल जवळ पाहण्यासाठी गर्दी केली होती. व शुभमच्या अश्या जाण्याने हळहळ देखील व्यक्त केली.
शुभमने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अजुन तरी समजु शकले नाही. भिगवण पोलीस स्टेशन येथे शुभमचा छोटा भाऊ ललित ओमप्रकाश खराडे, वय 27 वर्षे, धंदा नोकरी, रा. शेटफळगढे ता. इंदापुर जि. पुणे याने फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस हवालदर कर्चे करीत आहेत.

Discussion about this post