• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थी संख्येच्या नावाखाली मराठी शाळा बंद करू नका; ‘मराठी शाळा वाचवा’साठी आजरा तहसीलवर भव्य मोर्चा.

by
February 27, 2026
in Blog
0
विद्यार्थी संख्येच्या नावाखाली मराठी शाळा बंद करू नका; ‘मराठी शाळा वाचवा’साठी आजरा तहसीलवर भव्य मोर्चा.
0
SHARES
37
VIEWS

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

Ad 1

आजरा | प्रतिनिधी
विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करून मराठी शाळा बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे, अशी ठाम मागणी करत काल ‘मराठी शाळा वाचवा’ या घोषणेखाली आजरा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई (पेरणोली) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मोर्चानंतर मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले. मोर्चातील उपस्थिती आणि शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय संख्या पाहून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या कार्यकर्ते व नेत्यांचा अभिमान वाटत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या आंदोलनात एक विशेष लक्षवेधी बाब म्हणजे आजरा तालुक्याचे माजी सभापती अल्बर्ट डिसोजा (वाटंगी) यांची उपस्थिती. शारीरिकदृष्ट्या आजारी असतानाही त्यांनी मोर्चात सहभाग घेतला. थकवा जाणवत असल्याने ते मोर्चातील सहभागींसोबत बसून आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या या कृतीने उपस्थित शिक्षक व कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आदर आणि कृतज्ञतेची भावना दिसून आली.
पाच वर्षे सभापतीपदावर असताना प्राथमिक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी केलेले भरीव काम अनेकांना आठवले. “सत्तेच्या खुर्चीवरून माणूस गेला तरी त्याचं कर्म शिल्लक राहतं” हे वाक्य त्यांच्या कार्यातून पुन्हा अधोरेखित झाले, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
अनेक वर्षे स्वतःच्या पदरमोडीतून मराठी हायस्कूल चालवणारे आणि आजही आजारी अवस्थेत मराठी शाळा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले माननीय अल्बर्ट डिसोजा यांची उपस्थिती सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली.
प्राथमिक शिक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई यांची चाललेली धडपड अभिमानास्पद असून, मराठी शाळा वाचवण्याचा हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मराठी भाषा, मराठी शाळा आणि ग्रामीण शिक्षण वाचवण्यासाठी हा लढा अखंड सुरूच राहील, असा ठाम संदेश या मोर्चातून देण्यात आला.

Previous Post

आजरा हायस्कूलचे तालुका स्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश.

Next Post

7मार्च पासून मिरज तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचें आयोजन: तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांची माहिती

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post
7मार्च पासून मिरज तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान  शिबिर अभियानाचें आयोजन: तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांची माहिती

7मार्च पासून मिरज तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचें आयोजन: तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांची माहिती

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In