नायगाव तालुका प्रतिनिधी…दिपक गजभारे घुंगराळेकर…
ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबात २८ संप्टेबर १९८४ रोजी जन्म घेउन वडिलांनी केलेले समाजकार्य नेटाने पुढे नेन्यांचा सदैव प्रयत्न करनारे कुनाचे कसलेही राजकीय पाठबळ नसताना आपल्याच मित्रांच्या माध्यमातून वंचिताना विविध माध्यमातून मदत करन्यासाठी स्थापन केलेल्या स्वराज्य युथ फॉउन्डेशनचे संस्थापक अध्यक्ष गोविंद ज्ञानोबा हनवटे हे आज कित्येकांचे अधारस्तंभ बनले आहेत अशा या दुसर्याच्या सुखातच आपले सुख आहे असे मानुन वंचित असलेल्या कुटुंबियांना अधार देन्यासाठी अहोरात्र परीश्रम घेणारे गोविंद हनवटे नरसीकर यांच्या पस्तीसव्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा व त्यांच्या पुढिल कार्यास व वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
जिद्दीने अभ्यास करून प्रावेट क्षेत्रात काम करत असताना सतत वंचित कुटंबातील नागरिकांना मदत करण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेणारे गोविंद हनवटे नरसीकर यांनी दुसर्याचे सुख हेच आपले सुख समजुन सामान्य कुटंबातील होतकरू व हुशार विद्यार्थाना योग्य मदत करता यावी हाच दुरदृष्टी कोण डोळ्यासमोर ठेवून आपल्या विविध मित्रांच्या माध्यमातून स्वराज्य युथ फॉउन्डेशनची स्थापना करून या फॉउन्डेशनच्या माध्यमातून विविध वंचिताना गोविंदनी आधार देण्याचे कार्य करत असल्याने त्यांचा हा आदर्श विच्यार दिग्गज विविध उच्च पदावर असलेल्या व राजकीय नेत्यांना लाजवेल असाच म्हणावा लागेल.
गोविंद हनवटे नरसीकर यांच्या संकल्पनेतुन स्थापन करण्यात आलेल्या स्वराज्य युथ फॉउन्डेशनच्या माध्यमातून गेल्या च्यार ते पाच वर्षापासून सामान्य कुटंबातील होतकरू व हुशार विद्यार्थाना योग्य शिक्षण मिळावे म्हणून सुमारे २२ विद्यार्थ्यांना दत्तक घेउन त्यांच्या पुढिल पुर्ण शिक्षणाचा आर्थिक भार उचलले. अशाच एका अनाथअसलेल्या मुलीला शैक्षणिक मदत करून तिच्या विवाहाच्या वेळीसंसार उपयोगी च्याळीस हजाराची साहित्य देऊन मोठा हातभार लावले. रक्त दान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान केल्यास एकाध्या गरजूचा जिव वाचू शकतो त्यामुळे युवा पिढिने रक्तदान केले पाहिजे हाच दुरदृष्टी कोण डोळ्यासमोर ठेवून अनेकवेळा रक्त दान शिबिर आयोजित करून रक्त दान केले.
सेवेसाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशाची सेवा बजावनार्याचा कधि कुठे सन्मान करन्यात यत नाही मात्र अशी देशसेवा करनार्या माजी सैनिकव पोलिस कर्मचार्याचा सन्मान करून त्यांच्या विशेष कार्याचा गौरव करण्यात आला. मराठा समाजाला जातिचे प्रमाणपत्र काढन्या संबंधी डिजीटल पत्रक व मार्गदर्शन मोफत करण्यात आले. वाढत्या अपघाता पासुन बचाव करण्यासाठी वाहतुकीच्या नियमाची जणजागृती करण्यात आले. विविध गावातील मुख्य ठिकाणी सोलर लॅप मोफत बसवुन देन्यात आले.
ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थाना मोफत संगनक प्रशिक्षण व अभ्यासीका वर्ग सुरू करण्याचा संकल्प हाती घेउन याचा कांडाळा या गावापासून शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम विविध गावामध्ये राबवन्याचा संकल्प हाती घेतले. ग्रामीण भागातील विविध पत्रकार सामान्य कुटंबातील नागरिकावर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखनीच्या माध्यमातून सदैव प्रयत्न करीत असतात परंतु अशा या पत्रकार बांधवांच्या सुख दुखात कोणीही सोबत नसते म्हणून अशा या ग्रामीण भागातील विविध पत्रकार बांधवांचा विमा काढुन देन्यात आले.
विविध महापुरूषाच्या जयंती कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून सदैव दुसर्याच्या सुखातच आपले सुख आहे असे माननारे तरूण युवा कार्यकर्ते गोविंद ज्ञानोबा हनवटे यांच्या या विषेश कार्यास सलाम व त्यांच्या हातून असेच कार्य करन्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो हिच त्यांच्या वाढदिवसा निमित्त सदिच्छा…….आपलाच- मिलिंद बच्छाव कांडाळकर…( स्वराज युथ फाऊंडेशन नांदेड )
Discussion about this post