• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कहाटुळ येथे हरवलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू; 23 दिवसांनंतर शेताच्या बांधावर मृतदेह आढळला, गावकऱ्यांमध्ये संताप

by
March 5, 2026
in Blog, देश विदेश
0
कहाटुळ येथे हरवलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू; 23 दिवसांनंतर शेताच्या बांधावर मृतदेह आढळला, गावकऱ्यांमध्ये संताप
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी – संतोष आखडमल

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटुळ येथे हरवलेल्या महिलेचा तब्बल 23 दिवसांनंतर शेताच्या बांधावर मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा सुरू आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

मृत महिलेचे नाव राणूबाई ईशी (वय 65 वर्षे) असे असून त्या आर.पी.आय. पक्षाच्या शहादा तालुक्यातील माजी महिला अध्यक्षा होत्या. सामाजिक कार्यामुळे त्या परिसरात परिचित होत्या. राणूबाई ईशी या 8 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर जवळपास तीन आठवडे उलटल्यानंतर त्याच गावातील एका शेताच्या बांधावर त्यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

घटनेची बातमी समजताच समाजातील नागरिक आणि बांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा घातपात आहे की अपघात, याबाबत विविध चर्चा सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या घटनेमुळे कहाटुळ व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. या घटनेमुळे तालुक्यातही मोठी चर्चा सुरू झाली असून नागरिकांचे लक्ष तपासाच्या निष्कर्षाकडे लागले आहे.

Tags: ब्रेकिंग न्यूज कहाटुळ येथे हरवलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू; 23 दिवसांनंतर शेताच्या बांधावर मृतदेह आढळला
Previous Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; अफवांमुळे नागरिकांची धावपळ​

Next Post

मुख्यमंञी समृध्द ग्राम अभियानांतर्गत पाहणी दौरा

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
55
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
मुख्यमंञी समृध्द ग्राम अभियानांतर्गत पाहणी दौरा

मुख्यमंञी समृध्द ग्राम अभियानांतर्गत पाहणी दौरा

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In