• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 24, 2026
in Blog
0
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

भडगाव | प्रतिनिधी

पाचोरा वनक्षेत्रातील भडगाव परिमंडळ अंतर्गत नियत क्षेत्र आमडदे येथील मौजे भटगाव शिवारात एका मादी बिबटाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वन विभागाने घटनास्थळी धाव घेत मृत बिबटाचे शवविच्छेदन करून पुढील तपास सुरू केला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी राजेंद्र रामदास पाटील यांच्या शेतालगत असलेल्या बांबरूड–भटगाव रस्त्याच्या कडेला हा मृत बिबट आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, हा बिबट मादी असून तिचे वय अंदाजे दोन वर्षे असल्याचे वन विभागाने सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पशुधन विकास अधिकारी, भडगाव यांच्या पथकाने मृत बिबटाचे शवविच्छेदन केले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने व्हिसेरा नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

ही संपूर्ण कार्यवाही अमोल पाटील (सहाय्यक वनसंरक्षक, जळगाव), राजेश ठोंबरे (मानद वन्यजीव रक्षक, जळगाव) यांच्या उपस्थितीत सरिता पाटील (वनपरिक्षेत्र अधिकारी, पाचोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

वन विभागाकडून बिबटाच्या मृत्यूमागील कारणांचा सखोल तपास सुरू असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

Previous Post

जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ रत्नागिरीत निषेध मोर्चा; विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा सहभाग

Next Post

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In