• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देलनवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण

by
March 6, 2026
in Blog
0
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

नितेश गट्टीवार गडचिरोली:दि.६मार्च

शिवसाम्राज्य प्रतिष्ठान व समस्त ग्रामवासीय देलणवाडी यांच्या वतीने अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत देलनवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

या सोहळ्याला महेंद्र ब्राम्हणवाडे अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करून अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पाडले व उपस्थितांना मार्गदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, शौर्य आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा उल्लेख करत स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेल्या महान कार्याचा गौरव केला.

पुढे बोलताना महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अदम्य धैर्य, शौर्य आणि दूरदृष्टीच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या काळात अनेक अडचणी, संकटे आणि परकीय सत्तांचा दबाव असतानाही शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्ता, पराक्रम आणि रणनीतीच्या जोरावर स्वराज्याची पायाभरणी केली. त्यांनी सामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत न्याय, सुरक्षितता आणि सन्मान मिळवून देणारा आदर्श राज्यकारभार उभारला. त्यांच्या राज्यकारभारात सर्व धर्म आणि जातींना समान वागणूक देण्यात आली, तसेच महिलांच्या सन्मानाचे आणि जनतेच्या सुरक्षेचे विशेष भान ठेवले गेले. त्यामुळे शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत.तसेच त्यांनी आजच्या तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि आदर्शांचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कार्य आपल्याला समाजासाठी निःस्वार्थपणे काम करण्याची प्रेरणा देते. तरुणांनी शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांच्या आधारावर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजात एकता, बंधुता आणि स्वाभिमान टिकवून ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे.

शेवटी त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याचा वारसा जपणे, त्यांच्या आदर्शांवर चालणे आणि समाजात स्वाभिमान, एकता व राष्ट्रप्रेम वाढवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिवाजी महाराजांचे जीवनकार्य हे संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणेचा स्रोत असून त्यांच्या स्मरणातून आपल्याला राष्ट्रसेवेची आणि समाजहिताची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम,माजी आमदार कृष्णाजी गजभे, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, शीतलताई सोमनानी, चंदाताई कोडवते, नितीन कोडवते,प्रियांकाताई कुमरे, सौं. पूनमताई गुरनुले, शोभाताई सोमनाणी,डी के. मेश्राम , भाईचंद गुरनुले, रामदास डोंगरवार,दिलीप कुमरे, माणिक पेंदाम, राहुल धाईत, मनोहरराव तितीरमारे, मिनेश्वर जांभुळे सह मान्यवर, नागरिक, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

भूम पंचायत समिती सभापती पदी पूजा ढगे तर उपसभापती पदी प्रियांका रणबागुल यांची निवड

Next Post

सावधान! आजरा पोलीस स्टेशन परिसरात कचरा टाकाल, तर होईल थेट कारवाई; पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
7
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
0
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
1
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
Blog

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

July 24, 2026
14
Next Post
सावधान! आजरा पोलीस स्टेशन परिसरात कचरा टाकाल, तर होईल थेट कारवाई; पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

सावधान! आजरा पोलीस स्टेशन परिसरात कचरा टाकाल, तर होईल थेट कारवाई; पोलिसांचा 'ॲक्शन मोड'

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In