भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता कांदिवली पश्चिम येथील माखेचा सभागृह,मंगुभाई दत्ताणी रोड, इराणी वाडी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी चारकोप विधानसभा कार्यकर्ता मेळावा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
यावेळी आगामी निवडणुका व केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ यावर प्रमुख मार्गदर्शक चारकोप विधानसभा आमदार योगेश सागर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
चारकोप विधानसभा मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे १७००० महिलांना पैसे मिळाले आहे.मुंब ई मधील भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक, वरिष्ठ कार्यकर्ता,व वार्ड चे पदाधिकारी, चांगले काम करतात.
यावेळी बोरीवली पेक्षा जास्त मतांनी कांदिवली चारकोप आमदार निवडून यायला पाहिजे.
या भारतीय जनता पार्टी चारकोप विधानसभा चे नगरसेवक, वरिष्ठ पदाधिकारी, शक्ती प्रमुख,बुथ प्रमुख,वार्ड चे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते पुरुष व महिला या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.मेळाव्या नंतर सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.



Discussion about this post