भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता जय तुळजाभवानी मंदिर,जय तुळजाभवानी चाळ, वडार पाडा रोड नंबर २, हनुमान नगर कांदिवली पूर्व या ठिकाणी कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी गोंधळी समाज प्रबोधन मंडळास सांस्कृतिक कार्यक्रमांचे साहित्य देऊन पारंपरिक कलेला प्रोत्साहन दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून जय तुळजाभवानी मंदिरात विशेष करून नवरात्र उत्सवात देवी ची आरती करण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता लक्षात घेऊन तेथील जय तुळजाभवानी मंदिर ट्रस्टला कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी गोंधळी समाज प्रबोधन मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे साहित्य देऊन त्यांच्या पारंपरिक कलेला प्रोत्साहन दिले याबाबत जय तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने आमदार अतुल भातखळकर यांचे आभार मानले.
तसेच या वेळी गोंधळी समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष मारुती साळुंके शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी अखिल भारतीय गोंधळी समाजाचे अध्यक्ष गिरीधर साळुंके यांनी सांगितले की,” आमचा प्रयत्न राहील की, महाराष्ट्रात प्रत्येक तालुका, जिल्हा या ठिकाणी गोंधळी समाज भवन उभे करण्यासाठी संपर्क सुरू केला आहे.
या प्रसंगी सुधीर शिंदे, विजय वाडेकर,जनक साळुंके, कलाकार फुलचंद वाडेकर, नागेंद्र काळे, सुधाकर गरडकर, दीपक साळुंके, मधुकर गरडकर, दिगंबर वाडेकर , सुग्रीव शिंदे, अशोक वाडेकर,हरिबा किंडे आदी उपस्थित होते.
Discussion about this post