• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मालती महविद्यालयात ‘लघुशोध प्रकल्प लेखन एवं पुस्तक परीक्षण’ कार्यशाळा संपन्न..

by
March 17, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी / ईश्वरपूर :

वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीद्वारे संचलित मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय, ईश्वरपुर येथे अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत पदवी व पदव्युत्तर हिंदी विभागाच्या वतीने ‘लघुशोध प्रकल्प लेखन एवं पुस्तक परीक्षण’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, ईश्वरपुर येथील हिंदी विभागाध्यक्ष डॉ. प्रकाश आठवले उपस्थित होते. त्यांनी प्रथम सत्रात ‘पुस्तक परीक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करताना पुस्तक परीक्षणाची संकल्पना, उद्दिष्टे, तत्त्वे, स्वरूप तसेच त्यातील तांत्रिक बाबी यांचे सविस्तर विवेचन केले.

सिनेमा जसा रसिकांकडून आवडीने पाहिला जातो व त्यावर चिकित्सक चर्चा केली जाते, त्याचप्रमाणे पुस्तक परीक्षण हेही वाचनसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण व विचारप्रधान भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुस्तक परीक्षणाच्या प्रक्रियेत आशय, अभिव्यक्ती, रचना, भाषाशैली, लेखकाची भूमिका तसेच साहित्यिक मूल्यांचा सुसंगत विचार अपेक्षित असतो, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तक परीक्षणाचे काही नमुनेही दाखविण्यात आले.द्वितीय सत्रात ‘संशोधन प्रकल्प’ या विषयावर डॉ. आठवले यांनी मार्गदर्शन केले. संशोधन विषयाची निवड, उद्दिष्टनिश्चिती, गृहीतके, संशोधन पद्धती, माहिती संकलन, संदर्भलेखन, प्रकल्परचना आणि निष्कर्ष मांडणी या संशोधन प्रकल्पाच्या तांत्रिक अंगांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.संशोधनवृत्ती, चिकित्सक दृष्टी आणि शैक्षणिक शिस्त यांचा विकास घडविण्यास अशा कार्यशाळांचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो, असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर यांनी सध्याच्या बदलत्या काळात वाचनसंस्कृती कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय अंगीकारून वाचलेल्या साहित्यकृतींचे परीक्षण करण्याची वृत्ती विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या वैचारिक आणि शैक्षणिक विकासासाठी उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन करून त्यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख निलेश डामसे तर सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले.

यावेळी डॉ. अशोक मरळे, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील हिंदी विभागाचे डॉ. शेख, प्रा. थोरात मॅडम तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय येथील हिंदी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित होते.

Previous Post

जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा पानचिंचोली चे एमटीएस परीक्षेमध्ये 31 पैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली

Next Post

रावेरच्या विशाल अग्रवाल यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026’ पुरस्कार

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
28
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
109
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post

रावेरच्या विशाल अग्रवाल यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026’ पुरस्कार

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In