• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंदाणा येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिर; ५० अर्ज नोंदणी, ई-केवायसीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
मंदाणा येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिर; ५० अर्ज नोंदणी, ई-केवायसीला उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शहादा (प्रतिनिधी) : नंदुरबार जिल्ह्यातील मंदाणा (ता. शहादा) येथे दिव्यांग बांधव व भगिनींसाठी विशेष नोंदणी व मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० अर्जांची नोंदणी करण्यात आली असून ई-केवायसी प्रक्रियेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली शेठी यांच्या दूरदृष्टीकोनातून आणि दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मार्च रोजी हे शिबिर पार पडले.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

मनुदेवी फाउंडेशनच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर आणि लुईस ब्रेल यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.

शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये एकूण ५० लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच लालसिंग पावरा यांच्या सहकार्याने २० जणांचे ई-केवायसी पूर्ण करण्यात आले. ९ नवीन यूडीआयडी कार्डांसाठी अर्ज सादर करण्यात आले, ९ कार्डांना आधार लिंक करण्यात आले, तर ३ जन्मतारखा दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली.

या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी मार्गदर्शन करताना, “जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात आणि कोणालाही तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहावे लागू नये, हाच या शिबिराचा उद्देश आहे,” असे सांगितले.

कार्यक्रमाला सरपंच सुशिलाबाई पवार, उपसरपंच शरद साळुंखे, ग्रामसेवक दिनेश पाटील, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कुवर, सुनिताताई कुवर, जयश्री जाधव, धरमसिंग पावरा, राजेंद्र खर्डे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरादरम्यान नागरिकांसाठी चहा, नाश्ता व पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमाबद्दल मंदाणा परिसरातील दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूवर कठोर कारवाईची मागणी; अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

अप्सरा फायटरला नमवत बिस्की रॉयल्स सलग दुसऱ्यांदा ठरले चॅम्पियन!

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
11
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
15
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
20
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
39
Next Post
अप्सरा फायटरला नमवत बिस्की रॉयल्स सलग दुसऱ्यांदा ठरले चॅम्पियन!

अप्सरा फायटरला नमवत बिस्की रॉयल्स सलग दुसऱ्यांदा ठरले चॅम्पियन!

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In