• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूवर कठोर कारवाईची मागणी; अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूवर कठोर कारवाईची मागणी; अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

शहादा (प्रतिनिधी) : नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन निवासी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना देण्यात आले.

निवेदनात अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून त्यामागे बुवाबाजी, अंधश्रद्धा, सत्ता आणि लैंगिक शोषण यांचे गंभीर जाळे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. समाजातील भीती, असुरक्षितता व अडचणींचा गैरफायदा घेत तथाकथित अध्यात्म, ज्योतिष व दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण होत असल्याचा आरोप करण्यात आला.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (SIT) निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, तसेच दोषींवर कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम २०१३ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

फलज्योतिषाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याचीही मागणी करण्यात आली. पीडित महिलांचे संरक्षण, त्यांची ओळख गोपनीय ठेवणे, कायदेशीर व मानसोपचार मदत उपलब्ध करून देणे तसेच साक्षीदारांना सुरक्षा देणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

याशिवाय आरोपीचे राजकीय व प्रशासकीय संबंध उघड करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच राज्यभर अशा भोंदूगिरीच्या प्रकरणांचा शोध घेऊन गुन्हे नोंदविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असेही निवेदनात नमूद आहे.

या वेळी अस्मिता मोहिते, मिनाक्षी आगळे, रेखा तायडे, राजनंदनी मंगळे, सोनल आगळे, मालती मोहिते, राज्य प्रशिक्षण विभाग कार्यवाह कीर्तीवर्धन तायडे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी, सूर्यकांत आगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ अभियानांतर्गत गुलीउंबर शाळेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

Next Post

मंदाणा येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिर; ५० अर्ज नोंदणी, ई-केवायसीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
11
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
15
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
20
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
39
Next Post
मंदाणा येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिर; ५० अर्ज नोंदणी, ई-केवायसीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदाणा येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिर; ५० अर्ज नोंदणी, ई-केवायसीला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In