• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंढरपूरमध्ये माथाडी कामगारावर हल्ला; आरोपी अटकेपर्यंत काम बंदचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

पंढरपूर (प्रतिनिधी):
पंढरपूर येथील रेल्वे मालधक्का परिसरात काम करणाऱ्या एका माथाडी कामगारावर रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराकडून भरदिवसा मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 21 वर्षीय आभिजीत आबासाहेब चव्हाण हा कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत तसेच ओठाला गंभीर दुखापत झाली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मिळालेल्या माहितीनुसार, आभिजीत चव्हाण हा ग्रामीण भागातील आढीव गावातून उपजीविकेसाठी पंढरपूर येथे रेल्वे मालधक्क्यावर काम करतो. घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास तो पाणी आणण्यासाठी गेला असता, नशेत असलेल्या रिक्षाचालकाने व त्याच्या सहकाऱ्याने कोणतेही कारण नसताना त्याच्यावर हल्ला केला. पंढरपूर रेल्वे मैदान गेटसमोर ही घटना घडली असून आरोपींनी आपली दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचा आरोप आहे.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर संतप्त माथाडी कामगारांनी एकत्र येत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही व व्हिडिओच्या आधारे तपास करत आरोपींची ओळख पटवली असून सोन्या वाघमारे (रा. भंटुबरे, ता. पंढरपूर) व दीपक बंद्दपटे (रा. जुना कराड नाका) अशी त्यांची नावे असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 352(3) व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी माथाडी कामगारांनी काम बंदचा इशारा दिला असून, आरोपी अटकेपर्यंत काम बंद ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

Ad 1
Previous Post

मुलुंडमध्ये ‘कोकणी अवलिया’चा संगीत सोहळा; वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमासाठी निधी उभारणी

Next Post

शिवाजी पेठेत ‘माही’ यात्रेनिमित्त मटण वाटपासाठी पहाटेपासूनच गर्दी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
शिवाजी पेठेत ‘माही’ यात्रेनिमित्त मटण वाटपासाठी पहाटेपासूनच गर्दी

शिवाजी पेठेत ‘माही’ यात्रेनिमित्त मटण वाटपासाठी पहाटेपासूनच गर्दी

ताज्या बातम्या

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In