• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तारापूर एमआयडीसीची अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

(पालघर जिल्हा प्रतिनिधी श्री केविल पाटील)

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बोईसर: तारापूर औद्योगिक पट्टयातील चित्रालय ओटला मार्केट परिसरात आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात आलेली अतिक्रमण विरोधी मोहीम कमालीची हिंसक आणि थरारक ठरली. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसून दोन कामगार गंभीर जखमी झाले असून, संतप्त जमावापासून जीव वाचवण्यासाठी जेसीबी चालकाने वाहने उडवत पळ काढल्याने परिसरात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

“जेसीबी चालकाचा थरार, वाहने उडवत काढला पळ : दोन कामगार गंभीर जखमी “

दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून एमआयडीसीचे अधिकारी अविनाश संखे यांच्या उपस्थितीत चित्रालय परिसरात जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे, लोखंडी शेड तोडण्याचे काम सुरू होते. कारवाई दरम्यान अनधिकृत टपरी चे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

कारवाई पुढे सुरू असताना, काही व्यावसायिक आपली दुकाने आणि शेडमधील सामान स्वतःहून सुरक्षित बाहेर काढत होते. दोन कामगार लोखंडी शेडवर चढून पत्रे काढण्याचे काम करत असतानाच, जेसीबी चालकाने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय शेडवर पंजा मारला. यामुळे संपूर्ण शेड कोसळून दोन्ही कामगार उंचावरून खाली फेकले गेले. या अपघातात त्यांच्या डोक्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.

हे दृश्य पाहताच तेथील कामगार आणि व्यावसायिकांचा संयम सुटला आणि त्यांनी जेसीबी चालकाच्या दिशेने धाव घेतल्याचे पाहून घाबरलेल्या जेसीबी चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मागे-पुढे न पाहता जेसीबी वेगाने दवडल्यामुळे उभ्या असलेल्या असलेल्या एका टाटा इलेक्ट्रिक कारला आणि आयसर टेम्पोला जोरदार धडक बसली. कार चालकाचा जीव थोडक्यात वाचला असला तरी वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सदर कारवाई बाबत कोणतीही पूर्वसूचना न दिल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

सध्या या प्रकरणाची नोंद बोईसर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रात ठेवली. जखमी कामगारांवर उपचार सुरू असून, तसेच अतिक्रमण निष्क्षित करणार का व दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Kevil Patil
Previous Post

नाशिक मधील अनेक स्मशानभूमी मोजताय अखेरच्या घटका

Next Post

पालघरमधील विराज प्रकल्प जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थ आक्रमक

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

पालघरमधील विराज प्रकल्प जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थ आक्रमक

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In