• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अर्धापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
अर्धापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

अर्धापूर, ता. १० (बातमीदार)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जयंती मंडळाचे अध्यक्ष उमाकांत (उमेशभाऊ) सोनाजी सरोदे यांनी याबाबत माहिती दिली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या कार्यक्रमांची सुरुवात शहरातील प्रज्ञा बौद्ध विहार येथे शनिवार (ता. ११) रोजी सकाळी ९ वाजता होणार असून, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

त्यानंतर मंगळवार (ता. १४) रोजी सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार असून गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प, धूप व दीप अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

शनिवार (ता. १८) रोजी “महामानवास अभिवादन” या उपक्रमांतर्गत सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत १८ तासांच्या अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन अभ्यासाच्या माध्यमातून अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

तसेच २६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजवंदन, बुद्ध व आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, त्रिशरण पंचशील ग्रहण व प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे.

दरम्यान, १ मे रोजी बुद्ध पौर्णिमा व बुद्ध जयंतीनिमित्त सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजारोहण, पूजन व त्रिशरण पंचशील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी बसवेश्वर चौक ते तामसा कॉर्नर या मार्गावरून भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून प्रज्ञा बौद्ध विहार येथे कार्यक्रमाची सांगता होईल. यावेळी दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सर्व कार्यक्रमांमध्ये अर्धापूर शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

पणजी, गोवा येथे राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेत आमदार नमिताताई मुंदडा यांचा सक्रिय सहभाग

Next Post

कन्नड येथील शरद थोरात यांची जिल्हा महासचिवपदी निवड; कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
कन्नड येथील शरद थोरात यांची जिल्हा महासचिवपदी निवड; कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

कन्नड येथील शरद थोरात यांची जिल्हा महासचिवपदी निवड; कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In