• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिव येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी. जिल्हा. ददिनांक. १० शुक्रवार दैनिक ‘पुण्य नगरी’च्या कुपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस, पुण्य पुरस्कार, कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण होणार
राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती राहणार

RelatedPosts

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

धाराशिव: महाराष्ट्रातील सर्वात मोठा, बहुभाषिक अग्रगण्य वृत्तसमूह दैनिक ‘पुण्य नगरी’च्या कुपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण, पुण्य पुरस्कार व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.१२) संपन्न होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षीस व पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
धाराशिव शहरातील नगर परिषदनजिकच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी स. ११ वा. हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाराष्ट्र इन्स्टट्यिुशन फॉर ट्रान्सफार्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, माजी मंत्री आ. डॉ. तानाजीराव सावंत, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास घाडगे पाटील,

आ. प्रविण स्वामी, माजी आ. ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दैनिक ‘पुण्य नगरी’च्या कूपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सहकार क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन हभप वसंतराव नागदे, रुपामाता उद्योग समूहाचे चेअरमन ॲड. व्यंकटराव गुंड, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सह्याद्री हॉस्पीटल, अंकुर शिशुगृहाचे सर्वेसर्वा डॉ. दिग्गज दापके-देशमुख, बचत गट कार्यातून महिला सक्षमीकरणच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अर्चना माने, कसबे तडवळे (ता.धाराशिव) येथील आदर्श शिक्षक बाळासाहेब जमाले, व्यसनमुक्ती क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल येरमाळा येथील श्री येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. संदीप तांबारे, तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतशील शेतकरी हणमंत गवळी, पार्डी (ता.वाशी) येथील पोल्ट्री उद्योजक विठ्ठल चौधरी, जकेकुरवाडी(ता.उमरगा) येथील आदर्श सरपंच अमर सूर्यवंशी यांना दैनिक ‘पुण्य नगरी’ समूहाचा पुण्य पुरस्कार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरणही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये शोधवार्ता गटातून प्रथम बालाजी पांडुरंग वडजे (उमरगा), अमोल भास्कर मुळे द्वितीय (बीड), राजहंस तुकाराम कांबळे (उदगीर, जि.लातूर) व रोशन मुल्ला तृतीय(उदगीर, जि.बीड) तर विशेष वार्ता गटातून माधव आटकोटे (नांदेड) प्रथम , रमेश अर्जुन कदम (हिंगोली) द्वितीय, दिपक लिंबराज बारकुल (येरमाळा, जि.धाराशिव) व डॉ. रविंद्र भताने (चापोली, जि.लातूर) तृतीय यांना कै. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक ‘पुण्य नगरी’चे जिल्हा वृत्त संपादक धनंजय रणदिवे, पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष अब्बास सय्यद (भूम) व श्रीकांत कदम (तुळजापूर) यांनी केले आहे.

Ad 1
Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंना जयंती निमित्त आदरांजली..

Next Post

चाकूर येथील ज्येष्ठ वकील ॲड. डी. जे. कापसे (आबा) यांचे दुःखद निधन

Related Posts

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
ताज्या घडामोडी

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
19
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी
ताज्या घडामोडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
5
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा
ताज्या घडामोडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026
35
धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी
ताज्या घडामोडी

धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी

November 24, 2026
4
सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन
ताज्या घडामोडी

सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन

November 24, 2026
7
गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण
ताज्या घडामोडी

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

November 24, 2026
11
Next Post

चाकूर येथील ज्येष्ठ वकील ॲड. डी. जे. कापसे (आबा) यांचे दुःखद निधन

ताज्या बातम्या

सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान

सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान

November 24, 2026
माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In