बातमी :
कुंडलवाडी (प्रतिनिधी) : कै. मारुती पाटील लखमपूरे यांच्या स्मरणार्थ कुंडलवाडी शहरातील शिवामृत हॉस्पिटल येथे दि. ११ एप्रिल रोजी पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन कुंडलवाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी गजानन रमेश कोटलावार यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन डॉ. हनमंतराव लखमपुरे यांनी केले असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे असल्याचे सांगण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव भाले, उमेश भाले, मंडळ अध्यक्ष नरेश ठक्कुरवार, गंगाधर खुळगे, भीम पोतनकर, संजय खेळगे, नगरसेवक रमेश ईरलावार, नगरसेवक संजय गोणेलवार, संतोष चव्हाण, पांडुरंग दिमलवार, लखन नागुलवार, शिवा जायेवार, आकाश अर्जुने, किरण पाटील, सतिश चाकटवार, पाशावार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी कै. मारुती पाटील लखमपूरे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.
