• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन व रक्तदान शिबिर उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

बातमी :
शहादा, दि. ११ (प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य Mahatma Jyotiba Phule यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त शहादा येथे अभिवादन कार्यक्रमासह भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. Samata Parishad व समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

RelatedPosts

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

स्टेट बँक चौकातील महात्मा फुले व Savitribai Phule यांच्या स्मारकस्थळी कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष अभिजीत पाटील, उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार, तहसीलदार संभाजी पाटील, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील तसेच ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान डॉ. कांतीलाल टाटिया व माजी नगरसेवक रविंद्र जमादार यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांची आजच्या काळातही गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक राजेंद्र वाघ यांनी केले, सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले तर आभार रमाशंकर माळी यांनी मानले.

दरम्यान, आयोजित रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहनकुमार माळी, जगदीश माळी, यादव माळी, महेश माळी, वासुदेव माळी, बापू माळी, प्रविण वाघ, ईश्वर रोकडे, विपूल रोकडे, ईश्वर माळी, डी. डी. महाजन आदींनी परिश्रम घेतले. समता परिषद व माळी समाजाच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

नंदुरबार जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर; सहविचार सभेत मार्गदर्शन

Next Post

मंजरथ येथे खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन; आकर्षक बक्षिसांसह खेळाडूंना संधी

Related Posts

ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
20
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
27
ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
Next Post

मंजरथ येथे खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन; आकर्षक बक्षिसांसह खेळाडूंना संधी

ताज्या बातम्या

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

July 11, 2026

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In