• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

धाराशिव: “उद्धव ठाकरे भेटत नाहीत” असे रडगाणे गाणारे आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना भेटायला इतके का घाबरत आहेत? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी उपस्थित केला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

ॲड. भोरे यांनी शिंदेंच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार प्रहार करताना म्हटले की, “एकीकडे ‘धर्मवीर’ चित्रपटात स्वतःचे धाडस दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनाही न घाबरणारा सीन दाखवणारे शिंदे, प्रत्यक्षात आपल्याच कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरायला लागले? कारण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यामधे झालेल्या गोंधळाचे कारण देत खबरदारी म्हणून कार्यकर्त्यांना पहाटे घरातून उचलून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे माध्यमातून प्रसारित झाले आहेत.

शिंदेंना आता स्वतःच्याच कार्यकर्त्यांना भेटण्याची तर भीती नाही वाटू लागली ? जर तसे नसेल, तर मग धाराशिवमध्ये त्यांच्याच दौऱ्याआधी अविनाश खापे, नितीन पाटील, प्रवक्ता योगेश केदार यांच्यासह अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना पहाटे घरातून उचलून नजरकैदेत ठेवण्याचे ‘पाप’ कशासाठी?”

रझाकारी मानसिकतेचा निषेध:

पुढील टीकेत भोरे म्हणाले की, “निजामी राजवटीत ज्याप्रमाणे दडपशाही करून जनतेचा आवाज दाबला जायचा, तसाच प्रकार आज धाराशिवमध्ये पाहायला मिळाला. लोकशाहीत संवादाला महत्त्व असते, पण या सरकारमध्ये फक्त ‘नजरकैद’ आणि ‘दहशत’ उरली आहे. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राबवली जाणारी ही कार्यपद्धती म्हणजे नव्या रूपातील ‘रझाकारी’ मानसिकता तर नाही ना?”

शिवसैनिकांचा अपमान आणि भाजप पुत्राला पायघड्या:

“स्वतःला ‘शिवसैनिक’ म्हणवून घेणारे आणि स्वाभिमानासाठी उठाव केला असे सांगणारे शिंदे एकीकडे शिवसैनिकांना नजरकैदेत टाकत आहेत,विमानतळावर स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अडवून धरले
तर दुसरीकडे भाजप आमदारपुत्राला ‘रेड कार्पेट’ आणि ‘डायरेक्ट एन्ट्री’ दिली जात आहे. हाच का तुमचा शिवसैनिकांचा स्वाभिमान? सत्तेसाठी लाचारी पत्करणारे हे जनतेच्या मनातली भीती घालवण्याऐवजी, स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच नजरकैदेत ठेऊन घाबरवण्याचे काम करत आहे,” अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी जोरदार प्रहार केला आहे

Ad 1
Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

बेलोरा विमानतळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर

Next Post

ओमराजे यांची व्हिडिओ कॉलने हजेरी, 6 खासदारांची स्वाक्षरी व शपथ, शिवसेना उबाठा गट फुटणार ?

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
ओमराजे यांची व्हिडिओ कॉलने हजेरी, 6 खासदारांची स्वाक्षरी व शपथ, शिवसेना उबाठा गट फुटणार ?

ओमराजे यांची व्हिडिओ कॉलने हजेरी, 6 खासदारांची स्वाक्षरी व शपथ, शिवसेना उबाठा गट फुटणार ?

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In