• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओमराजे यांची व्हिडिओ कॉलने हजेरी, 6 खासदारांची स्वाक्षरी व शपथ, शिवसेना उबाठा गट फुटणार ?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
ओमराजे यांची व्हिडिओ कॉलने हजेरी, 6 खासदारांची स्वाक्षरी व शपथ, शिवसेना उबाठा गट फुटणार ?
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उबाठा गटातील खासदार यांची मुंबई येथे भेट झाली असुन त्या बैठकीत 6 खासदारांनी शिवसेना शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे या बैठकीला व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थितीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

RelatedPosts

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

8 एप्रिल रोजी रात्री 11 च्या सुमारास सुरू झालेली ही बैठक 9 एप्रिलच्या सकाळपर्यंत झाल्याचा दावा मुंबई येथील एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. बैठकीदरम्यान शिंदे हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कायम संपर्कात राहुन चर्चेचा तपशील व खासदार यांचे म्हणणे मांडत होते.

दरम्यान खासदार ओमराजे हे गोवा येथे हिंदी भाषेच्या समिती बैठकीत असुन गेल्या 4 वर्षापासून ही अशी चर्चा आहे, यावर काय प्रतिक्रिया द्यायची असे त्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. एखाद्या पक्षाच्या संसदीय किंवा विधान गटातील दोन-तृतीयांश सदस्य दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास सहमत झाले, तर ते अपात्रतेतून सुटतील. शिवसेना उबाठा संसदीय गटासाठी हा आकडा 6 खासदार यांचा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेल्या व त्यांना पाठिंबा दिलेल्या खासदारांनी पक्ष बदलण्याची शपथ घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे सामील झालेल्या दोघांनी पक्षात सामील होण्यास सहमती दर्शवली आहे.

ठाणे-पोखरण रोडवरील एका ठिकाणी 6 खासदार स्वतंत्रपणे पोहचले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व एक आमदार असे मोजके 4-5 जण त्या बैठकीला कोणत्याही ताफाशिवाय गुप्तता पाळत गेले. तिथे 6 खासदारांनी पक्ष विलीनीकरणात स्वारस्य दर्शवणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याचे सांगितले जाते. 2 खासदारांनी शहरात परतल्यावर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचे आश्वासन दिले असा दावा केला आहे.

मागील काही दिवसापुर्वी उद्धव ठाकरे यांनी पक्षफुटी व विविध चर्चाच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाच्या खासदार यांची बैठक घेतली त्यात खासदारांनी जाहीरपणे निष्ठेची शपथ घेतली, त्यामुळे आगामी काळात काय होते ते पाहावे लागेल.

21 जुन 2022 रोजी शिंदे यांनी 40 आमदारांना सुरत आणि गुवाहाटी येथे नेऊन बंड केले होते. भारतीय निवडणूक आयोगाने नंतर शिंदे गटालाच शिवसेना म्हणून मान्यता दिलीव त्यांना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह प्रदान केले.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

Next Post

” फाटक्या लुगडयात नांदली रमाई,.. तव्हा शालुत नटल्या नवऱ्या….

Related Posts

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत
ताज्या घडामोडी

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026
5
ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
25
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
26
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
8
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
16
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
19
Next Post

" फाटक्या लुगडयात नांदली रमाई,.. तव्हा शालुत नटल्या नवऱ्या….

ताज्या बातम्या

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026

शाळेसमोर विद्यार्थ्याला दुचाकीची धडक; युवा सेनेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी

July 12, 2026

निर्रट जुगार अड्ड्यावर औसा पोलिसांची धडक कारवाई; शिक्षकासह पाच जण रंगेहात ताब्यात

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In