बातमी :
अंबरनाथ (प्रतिनिधी) : महामानव Dr. B. R. Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती व जनरल प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोहन सबरविया व नवरे पार्क परिसरातील नागरिकांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमाबाबत अध्यक्ष सुदेश जाधव, डॉ. शैलेंद्र गायकवाड व डॉ. राहुल सुतार यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या शिबिरामध्ये विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार असून नागरिकांना वैद्यकीय मार्गदर्शनही दिले जाणार आहे.










