• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हायवाच्या धडकेत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेचा जागीच मृत्यूः

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
हायवाच्या धडकेत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेचा जागीच मृत्यूः
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

विरारच्या शिरसाड फाटा येथील घटना; चालक फरार तिल्हेर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या स्वीडल गोम्स; रस्ता ओलांडताना काळाचा घाला..

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

वसई – मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार शिरसाड नाका येथे शनिवारी सकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एक भरधाव हायवा ट्रकने जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षिकेला धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनसार स्वीडल गोम्स (४०) असे मयत शिक्षिकेचे नाव असुन त्या वसई पश्चिमेच्या निर्मळ येथे राहत होत्या. त्या तिल्हेर, म्हस्कर पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणुन कार्यरत होत्या. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या परंतु शिरसाड नाका येथे बस स्टॉपवर जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना, शिरसाडकडून भामटपाडा गावाकडे विरुद्ध दिशीने जाणाऱ्या एका हायवा ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ट्रकचे टायर अंगावरून गेल्याने स्वीडल गोम्स यांचा जागीच मृत्यू झाला अपघात घडल्यानंतर चालक ट्रकसह घटना स्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.. फरार ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत असुन. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्दैवी घटनेमळे तिल्हेर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गावर शोककळा पसरली आहे. एका कर्तव्यदक्ष शिक्षिकेचा अशा प्रकारे मृत्य झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ट्रक चालकांच्या बेदरकारपणाला आवर घाला. महामार्गावर हायवा ट्रक्सची दहशत वाढली असून, अनेकदा हे हायवा क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करतात. “विरुद्ध दिशोने वाहन चालवणे. अती वेग आणि अप्रशिक्षित चालक यांमुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. प्रशासनाने आता तरी जागे होऊन अशा बेदरकारपणे हायवा वाहने चालविणाऱ्यावर

कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली.

Ad 1
Previous Post

फलटण तालुक्यातील जिंतीची ऐतिहासिक बगाड यात्रा संपन्न

Next Post

कुंभारी (ता. जत) येथे पाझर तलाव फुटला; ६०-७० हेक्टर शेतीचे मोठे नुकसान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
कुंभारी (ता. जत) येथे पाझर तलाव फुटला; ६०-७० हेक्टर शेतीचे मोठे नुकसान

कुंभारी (ता. जत) येथे पाझर तलाव फुटला; ६०-७० हेक्टर शेतीचे मोठे नुकसान

ताज्या बातम्या

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In