• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फलटण तालुक्यातील जिंतीची ऐतिहासिक बगाड यात्रा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
फलटण तालुक्यातील जिंतीची ऐतिहासिक बगाड यात्रा संपन्न
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :निकेश भिसे

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

जिंती (ता. फलटण)
रविवार दि. 12 एप्रिल 2026
श्री जितोबा जिंती ग्रामदैवत
नीरा नदीच्या काठी वसलेल्या ग्रामदैवत श्री जितोबा देवाच्या प्रसिद्ध बगाड यात्रेला रविवारी “जितोबाच्या नावानं चांगभलं,च्या जयघोषात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून हजारो भाविकांनी हजेरी लावली.
सुमारे 350 वर्षाची परंपरा असलेली ही बगाड यात्रा फलटण तालुक्यात विशेष प्रसिद्ध असून भाविक भक्तांचे श्रद्धेचे केंद्र मानली जाते. राणनवरेवाडी, मांडकी, निमसाखर, निभोरे, शिंदेवाडी, लोणी तसेच कोल्हापूर, विदर्भ, आणि इत्यादी राज्यातील विविध भागांतून भाविक दर्शनासाठी जिंती मध्ये दाखल होतात
यात्रे दिवशी दुपारच्या सुमारास बगाडाचे मानकरी बगडाला तेल व कावाने सजवले जातात. भाविक आपले नवस बोलून नारळ अर्पण करतात तसेच बगाडाला पैसे बांधण्याची परंपरा आहे. हराळी वैष्णव समाजातील या बगडाचे प्रमुख मान आहे. ग्रामस्थ व कमिटीच्या वतीने मानकऱ्यांना पारंपरिक पोशाख देण्यात येतो.

यानंतर गुलाल खोबऱ्याची उधळले जाते आणि “जितोबाच्या नावानं चांगभलं बोला चांगभले च्या गजरात मानकरी बगाडावर चढतात. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर उत्सव पूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडतो. काही ठिकाणी मानकऱ्यांच्या पायावर पाणी ओतण्याची प्रथा देखील पार पाडली जाते.

यात्रेतील सर्वात आकर्षक ठरलेला ‘भाकणूक’ कार्यक्रम
भाविकभक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. या कार्यक्रमात वर्षभरातील पाऊस, पाणी, शेतीची स्थिती, तसेच रोगराईबाबत भाकीत करण्यात येते . या भाकणुकीला ऐकण्यासाठी दूरवरून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी पहाटे पालखी छबिना निघाली जाते

जितोबा देवस्थान कमिटी यांच्यावतीने भाविकभक्तांसाठी पिण्याचे पाणी, निवास व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

तसेच यात्रेनिमित्त परिसरात खेळण्यांची दुकाने, पाळणे,झोपाळे आणि विविध मिठाईची दुकाने उभारण्यात आली होती. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.

यात्रास्थळी वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचारी सतत कार्यरत होते. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी दक्षता घेत विशेषत,बगाड सोहळ्यावेळी व प्रमुख कार्यक्रमांच्या वेळी पोलीस बंदोबस्तामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.
ही भव्य दिव्य सुप्रसिद्ध बगाड यात्रा केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक एकात्मतेचे जिवंत प्रतीक ठरली,विविध भागांतून आलेल्या भाविक एकत्र येत श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवला. या यात्रेमुळे समाजातील बंधुभाव आणि पारंपरिक वारशाची जपणूक अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Tags: Nikesh Bhise
Previous Post

नाशिक ते कामाख्या देवी सायकल राईडरचे निफाड सायकलिस्टच्या वतीने स्वागत

Next Post

हायवाच्या धडकेत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेचा जागीच मृत्यूः

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
हायवाच्या धडकेत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेचा जागीच मृत्यूः

हायवाच्या धडकेत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेचा जागीच मृत्यूः

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In