• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणी जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट; उष्मालाट व पावसाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

उष्मालाटेत जनतेने विशेष काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

RelatedPosts

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

परभणी , दि. 17 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी दि. १७, १८, १९ व २० एप्रिल २०२६ या चार दिवसांकरीता येलो अलर्ट जारी केला आहे.

दि. १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट येण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर दि. १८ एप्रिल रोजीही उष्मालाट राहण्याची शक्यता आहे. दि. १९ व २० एप्रिल रोजी जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.

जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. दुपारी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी/ओढणी वापरणे आणि हलके, सैल कपडे परिधान करावेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी विशेष दक्षता घ्यावी. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

उष्मालाट काळातील घ्यावयाची काळजी

काय करावे :–
तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.
ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्या. हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे परिधान करा. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळा. बाहेर जाताना डोके झाका, टोपी/छत्री वापरा, गॉगल व सनस्क्रीनचा वापर करा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा. अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करा. पशुधन सावलीत ठेवा व पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या.

काय टाळावे :-
दुपारी उन्हात बाहेर जाणे व कष्टाची कामे करणे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक टाळा. मद्यपान, चहा, कॉफी, शीतपेये टाळा. जास्त तेलकट, तिखट, मिठाचे व शिळे अन्न खाऊ नका. वाहनात लहान मुले किंवा प्राणी बंद करून ठेवू नका. गडद व जाड कपडे परिधान करणे टाळा. तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रम टाळा. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा अनुराधा ढालकरी यांनी कळविले आहे.
–––-*

Previous Post

हकरमध्ये ACBची मोठी कारवाई महसूल अधिकारी २० हजारांची लाच घेताना पकडला

Next Post

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

Related Posts

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
Blog

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026
13
Blog

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
7
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.
Blog

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026
14
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.
Blog

अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.

September 2, 2026
19
Blog

सप्टेंबर मध्येही कमी पावसाचा अंदाज….

September 2, 2026
6
शेतकऱ्यांच्या महामार्ग आंदोलनाला राजकीय बळ; भाई दिगंबर कांबळे यांच्या जन आक्रोश आंदोलनाला खासदार विशाल दादा पाटील ,माजी मंत्री विश्वजित कदम साहेब व शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्यासह जाहीर पाठिंबा

17
Next Post

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In