• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घरकुल निधीच्या कथित गैरव्यवहाराला न्यायालयाचा दणका; माहूरच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

माहूर | प्रतिनिधी :

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात माहूर नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी विद्या पंडित कदम यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत प्रकरणाच्या सखोल तपासाला प्राधान्य दिले आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११२/२०२६ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित असलेला २ कोटी ७ लाख १ हजार ७२४ रुपयांचा निधी कथितरीत्या इतरत्र वळविण्यात आल्याचा आरोप आहे.

बचाव पक्षाने न्यायालयात संबंधित निधी शासनाच्या निर्देशानुसार अकोला येथील नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचा दावा केला. तसेच या व्यवहारातून कोणताही वैयक्तिक लाभ घेतलेला नसल्याचे सांगत अटकपूर्व जामीन देण्याची विनंती करण्यात आली.

मात्र, सरकारी पक्षाने लाभार्थ्यांच्या खात्यात निधी पोहोचविण्याची जबाबदारी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवरच असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अनेक लाभार्थी २०१६ पासून घरकुल अनुदानाच्या प्रतीक्षेत असून, या प्रकरणामुळे माहूरमध्ये आंदोलन, बंद आणि उपोषणासारखी आंदोलने झाली होती. त्यामुळे सत्य समोर आणण्यासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचा सखोल तपास आवश्यक असल्याचे नमूद केले. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने विद्या पंडित कदम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

या निर्णयामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, लाभार्थ्यांचे लक्ष आता पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे लागले आहे.

Tags: Kundan Tivadkar
Previous Post

‘सुपर 300’ प्रकल्पांतर्गत निफाड येथे महिला उद्योजिकांसाठी तीन दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण यशस्वी

Next Post

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय चव्हाण यांचा गौरव

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
80
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय चव्हाण यांचा गौरव

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In