• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘सुपर 300’ प्रकल्पांतर्गत निफाड येथे महिला उद्योजिकांसाठी तीन दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण यशस्वी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
70
VIEWS
Ad 1

निफाड | प्रतिनिधी

NASSCOM Foundation, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM-उमेद), निफाड यांच्या सहकार्याने आणि YouthAid Foundation यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘Super 300 Project’ अंतर्गत महिला उद्योजिकांसाठी तीन दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. 14 ते 16 जुलै 2026 या कालावधीत पंचायत समिती सभागृह, निफाड येथे आयोजित या प्रशिक्षणाला महिला उद्योजिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश महिला उद्योजिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचा व्यवसाय अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि शाश्वत बनविणे हा होता. कार्यशाळेत डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, ऑनलाइन व्यवसाय विस्तार, ग्राहक व्यवस्थापन, डिजिटल पेमेंट्स, व्यवसाय नियोजन, उत्पादन किंमत निर्धारण तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित व्यवसाय साधनांचा प्रभावी वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

समारोप कार्यक्रमास मा. नम्रता जगताप (गटविकास अधिकारी, पंचायत समिती निफाड), श्री. योगेश पाटील (व्यवस्थापकीय संचालक, WashMitra) आणि श्री. नितीन कापुरे (तालुका अभियान व्यवस्थापक, MSRLM-उमेद) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी बदलत्या डिजिटल युगात महिला उद्योजिकांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आत्मनिर्भरतेच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षणाचे मार्गदर्शन शिवाजी परमार (YEFi, जिल्हा समन्वयक – नंदुरबार) आणि हर्ष फपाळ (YEFi, जिल्हा समन्वयक – नाशिक) यांनी केले. त्यांनी आधुनिक डिजिटल साधनांचा वापर, ऑनलाइन विक्री, व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता आणि AI चा व्यवसायातील प्रभावी वापर याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणामुळे महिला उद्योजिकांना डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त झाली असून, बदलत्या बाजारपेठेच्या गरजांनुसार व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा आत्मविश्वासही निर्माण झाला आहे.

आयोजकांनी सांगितले की, ‘Super 300 Project’ अंतर्गत भविष्यातही नाशिक जिल्ह्यातील महिला उद्योजिकांसाठी कौशल्यविकास, डिजिटल सक्षमीकरण, व्यवसाय मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडणारे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत.

Previous Post

चक पिरंजी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न

Next Post

घरकुल निधीच्या कथित गैरव्यवहाराला न्यायालयाचा दणका; माहूरच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
80
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

घरकुल निधीच्या कथित गैरव्यवहाराला न्यायालयाचा दणका; माहूरच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In